डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या स्मारकासाठी अजित पवारांना निवेदन; तालुका गुटखा - मटका मुक्त करण्याची मागणी; वाचा कोणी केली मागणी?
-Kishor Gaikwad
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) दसरा मुहूर्ताच्या निमित्त मुरबाडमध्ये आयोजित राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व नवीन कार्यालय उदघाटन सोहळ्याला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, अभिषेक डुंकवाल, तेजस व्यापारी व कर्यकर्ते यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मुरबाड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक (Dr. Babasaheb Ambedkar Smarak Murbad) उभे करण्याच्या प्रमुख मागणी समवेत तालुक्यातील विविध समस्यांचे पत्र दिले.
त्यात प्रामुख्याने राज्यात गुटखा बंदी व मटका बंदी फक्त कागदावर असून राज्यात सरसकट गुटखा विक्री तसेच मटका सुरु आहे, संपूर्ण राज्यासह मुरबाड तालुक्याला गुटखा व मटक्या पासून मुक्त करावे या मागणी सह नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना जलद नुकसान भरपाई द्यावी, निवडणूक काळात सरसकट लाभ मिळालेल्या आणि त्यानंतर ऐन दिवाळी सणात योजनेतून बाद केलेल्या मुरबाडच्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ द्यावा, मुरबाडमध्ये सक्षम आरोग्य यंत्रणेचा अभाव असल्याने आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे, मुरबाड एमआयडीसी निम्याहून अधिक बंद असून मोठे उद्योग मुरबाडमध्ये आणण्यात यावे तसेच स्थानिक नागरिकांना कामावर घेऊन कामगारांची पिळवणूक थांबवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद करून कामगारांना कंपनीतर्फे घ्यावे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिष्यवृतीची तजवीत करावी, मुरबाड बस आगाराला ६ नवीन बसेस दिल्या परंतु त्याऐवजी जुन्या नेल्या, आणखीन बसेसची आवश्यकता असल्याने तसेच मुरबाड कल्याण प्रवासी संख्या सर्वाधिक असून बस संख्या अपुरी असल्याने अपुऱ्या बस गाड्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या प्रचंड मानसिक व आर्थिक त्रासापासून मुक्तीसाठी उपाययोजना करावी, शहरात नाना-नानी पार्कसाठी आर्थिक तजवीज करावी, आदी मागण्यांचे निवेदन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निवेदन स्वीकारून त्यावर जातीने लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिल्याचे वाघचौडे यांनी सांगितले. त्यामुळे मुरबाडच्या समस्या अजित पवारांच्या माध्यमातून थेट मंत्रालयातून मार्गी लागतील असा अशावाद व्यक्त केला जात आहे.
-Kishor K. Gaikwad, Murbad
0 Comments