Monsoon Red Alert : अतिवृष्टीच्या तडाख्याने मुरबाड तालुका जलमय; मुरबाडमध्ये कुठे-कुठे किती मिमी. पर्जन्यमानाची नोंद? कोण-कोणते रस्ते झाले बंद? वाचा, पहा फोटो..!
-Kishor K Gaikwad
ठाणे/मुरबाड (दि.२७) : (किशोर गायकवाड) हवामान खात्याने संभाव्यता दर्शविलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने मुरबाड तालुका अक्षरशः जलमय झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले असून याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागातून तहसीलदार अभिजित देशमुख यांनी महत्वपूर्ण अपडेट्स दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात दि. २८ रोजी रेट अलर्ट तर दि.२९ रोजी ऑरेंज अलर्ट व दि. ३० रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दि. २९ व ३० या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून आज जिल्ह्यात गडगडाटी पावसासह विजा चमकण्याची व ताशी ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. याबाबतचे प्रादेशिक हवामान विभागाचे परिपत्रक तहसीलदार देशमुख यांनी प्रसारित केले आहे.
मुरबाड व शहापूर तालुक्यांना जोडणारा चिखले येथील काळू नदीवरील पूल तसेच सापगाव येथील भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला. धसईकडून कांदळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने यामार्गे वाहतूक बंद राहिली.
मुरबाडी नदी पुन्हा दुथडी भरून वाहिली...
या अतिवृष्टीमध्ये मुरबाडी नदीने रौद्र रूप धारण केल्याचे पाहायला मिळाले असून मुरबाडी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहिली. परिणामी मुरबाडी नदी मार्गीकेवरील अनेक पूल पाण्याखाली येऊन रहदारी बंद पडली. मुरबाड रस्त्यापासून घोरले गावाकडे जाणाऱ्या मुरबाडी नदीवरील पूल नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. तसेच मुरबाडी नदीवरील डेहनोली येथील पूल जलमय झाल्याने महामार्गाकडे येणारा मार्गीका बंद राहिली. परंतु आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी रस्ता असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील किशोर येथून नांदेणी कडे जाणारा रस्ता देखील बंद राहिला.
भातपिकांचे अतोनात नुकसान...
या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हातातोंडांशी आलेली भातपिके होत्याची नव्हती झाली असून मुरबाडचा बळीराजा अक्षरशः मेटकुटीला आला आहे. त्यामुळे सरकारने आमच्या नुकसानींचे पंचनामे करून लवकरात लवकर आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी आर्त हाक ते मारीत आहेत. तर अतिवृष्टीमध्ये मुरबाडमधील ज्या शेकतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहेत त्यांनी पंचनाम्यासाठी तहसीलदार कार्याल व तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य सुभाष (आप्पा) घरत यांनी मुरबाडच्या शेतकऱ्यांना केले असून याबाबत काही अडचण आल्यास अथवा अधिक माहितीसाठी त्यांच्या 09920527006 या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधण्याबाबत सोशियल मीडियाद्वारे सूचित केले आहे.
मुरबाड तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे खांडपे गावातील नारायण तुंगार या शेतकऱ्याचे घर कोसळुन तो बेघर झाल्याने त्याला सरपंच अक्षता वाघचौडे व पती मदन वाघचौडे यांचे वतीने जीवनावश्यक वस्तु व तातडीची मदत देण्यात आली.
मुरबाडच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातून पर्जन्यमानाची देण्यात आलेली माहिती...
Murbad Rainfall 28/09/2025 —————————————————
Circle - Rain (mm)
—————————————————
Murbad - 278.00 mm
Dhasai - 54.00 mm
Nyahadi. - 68.00 mm
Saralgaon - 120.00 mm
Dehari - 73.00 mm
————————————————
Total - 593.00 mm
Average - 118.60 mm
“तहसील कार्यालय मुरबाड* दिनांक २८/०९/२०२५ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत चा एकूण पाऊस १३० मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. माळशेज घाट येथे पाहणी करून 3 JCB तैनात केले आहेत. तसेच काल पासून घाट पायथ्याशी कोतवाल, तलाठी व मंडळ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. सध्या पाऊसचा जोर कमी झाला असून तूरळक पाऊस सुरु आहे. सर्व मंडळ निहाय पाहणी केली असून कुठे ही मोठी घटना नाही. आज 2 घरांचे अंशतह नुकसान असून 1 घराचे भिंत कोसळी आहे. त्यांना रेशन व जीवनावशक वस्तू पुरवठा केला आहे.“
• पुर - १) मौजे - खांडपे येथील नारायण राघो तुंगार यांच्या घराची भिंत आजच्या अतिवृष्टीमुळे कोसळली आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या सजीवाची जीवित हानी झाली नाही. पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.२) आज दिनांक 28/9/2025 रोजी मौजे मेर्दी मधील बांडेशेत येथील संतोष कमळु दरवडा यांची दुभती म्हैस मेर्दी बांडेशेत नजीकच्या मालोड नदीपात्रात पुरामध्ये वाहुन गेली आहे. सदर म्हैसचा ग्रामस्थ यांचेमार्फत शोध घेतला असता सापडली नाही. याबाबत जबाब पंचनाम्यासह अहवाल सादर करण्याची तजबिज ठेवली असे.• रस्ते व वाहतूक - पुलावरून पाणी गेल्याने काही काळ रस्ते बंद होते. सध्या सर्व वाहतूक सुरळीत आहे.1)चिखले कडून शहापूर कडे जाणारा रस्ता बंद होता2)कल्याण मुरबाड रस्त्या पासून घोरले कडे जाणारा रस्ता बंद होता3) किशोर कडून नांदेणी कडे जाणारा रस्ता बंद होता4) डेहनोलीकडून खाटेघरकडे येणारा रस्ता बंदपर्यायी रस्ता/मार्ग आहे.५) मौजे शिवले वरून मौजे कळमखांडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पाणी गेले असून, पर्यायी रस्ता उपलब्ध आहे.६) धसई कडुन कांदळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे पाणी आले आहे....आपल्या माहितीसाठी
-Kishor K. Gaikwad, Murbad
0 Comments