![]() |
Instructions of Tokavde Police Station |
माळशेज वार्ता : माळशेज पर्यटन बंद की सुरू? वाचा सद्यस्थिती..!
मृत्यूचा घाट..! महामार्ग विभागाचा कोट्यवधींचा खर्च आणि स्थानिकांना रोजगाराचा अभाव..! वाचा सविस्तर..
[ KISHOR K. GAIKWAD MURBAD ]
ठाणे/मुरबाड : (किशोर गायकवाड) पावसाळा आला की पर्यटकांना माळशेजची हुरहुर भरते आणि ते थेट धाव घेतात या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर स्थित असणाऱ्या माळशेजला... मात्र माळशेज घाट पर्यटन बंद की सुरू? असा सवाल येथे येण्या आधी अनेकांना पडत असेल.
![]() |
Waterfall in Malshej Ghat |
पांढऱ्या शुभ्र धबधब्यांनी (Waterfalls) नटलेल्या माळशेजचे सौंदर्य; त्यावर धुक्याची दुलई, अर्थात पर्यटकांना भुरळ घालणारी मोहिनीच! त्यामुळे ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिकचे सर्वाधिक पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात. धुक्याने अच्छादिलेला माळशेज पाहतांना स्वर्गसुख प्राप्तीचा अनुभव आल्याचे ते सांगत असतात. परंतु अति वृष्टी, दरड कोसळणे यांसारख्या घटनांमुळे अनेकदा पर्यटनावर बंदीचे आदेश जारी केले जात असतात. नुकताच पावसाने सर्वत्र हाहाकार माजवल्याचे चित्र सर्वदूर पाहायला मिळाले. त्यामुळे माळशेजला जावे की न जावे? अशा संभ्रमात पर्यटक वर्ग दिसत आहे.
![]() |
Malshej Ghat |
![]() |
Malshej Ghat |
याबाबत टोकावडे पोलिस स्टेशनचे (Tokawade Police Station) सहा. पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांचेशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता पर्यटनावर बंदीचे आदेश नसून पर्यटकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असा सूचक सल्ला ही पर्यटकांना दिला आहे.
मृत्यूचा घाट..!
पुणे-ठाणे जिल्ह्याच्या (Pune-Thane District) हद्दीवर असलेला माळशेज घाट (Malshej Ghat) जितका सौंदर्याच्या वरदानाने समृद्ध तितकाच धोकादायक; त्यामुळे याला अनेक जन मृत्यूचा घाट म्हणून देखील संबोधतात. या सर्वास जबाबदार इथली प्रशासन व्यवस्था म्हणावी लागेल. अपघात प्रसंगी कोणत्याही अत्यावश्यक सुविधा येथे उपलब्ध नाही. मदत पोहचण्या आधीच अनेकदा अपघात ग्रस्तांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येते. वर्षानुवर्षे घाटात दुरुस्तीची कामे सुरू आहेत, मात्र नेमकी दुरुस्ती होते कसली? हा संशोधनाचा विषय बनला आहे. कारण, दरड कोसळण्याचे प्रमाण आणि अपघातांची मालिकाच संपत नाही. पर्यटक येथे आपल्या कुटुंबा समवेत आनंद उपभोगण्यासाठी येतात; मात्र कधी, कोणती हानी घडेल? या भयात ते दिसत असतात. तर पोलिसांना आपला जीव मुठीत घेऊन या पर्यटकांचे रक्षण करावे लागत आहे.
"माळशेजला येणाऱ्या पर्यटकांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. मात्र सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा परिस्थितीत पर्यटनाचा मोह आवरून आपली काळजी घ्यावी."
-श्री. संतोष दराडे, सहा. पोलिस निरीक्षक, टोकावडे पोलिस स्टेशन
![]() |
Potholes in Malshej Ghat |
![]() |
Potholes in Malshej Ghat |
महामार्ग विभागाचा कोट्यवधींचा खर्च होतो कुठे?
माळशेजला धोकादायक बनविण्यासाठी तितकेच जबाबदार महामार्ग विभाग देखील आहे. माळशेज घाट दरम्यान अनेक वर्षांपासून पडलेले खड्डे म्हणजे विना कारण अपघाताला आमंत्रण आहेत. दरवर्षी महामार्ग विभाग (National Highway Department) घाट महामार्गावर करोडो रुपये खर्च करते, परंतु अजूनही वाहतूक सुरक्षित झाली नाही. त्यामुळे हा पैसा नेमका खर्च होतो कुठे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तालुका लोकप्रतिनिधी घाटात वॉकवे (Walkway) बांधणार असल्याबाबत कायम बोलत असतात. परंतु तेथवर पोहचण्यासाठी सुरक्षित महामार्ग आधी दिला पाहिजे, अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.
![]() |
अनिल बांगडे, सावर्णे (चहा, कणस विक्रेता) |
स्थानिकांना रोजगाराचा अभाव..!
गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या येथील दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या राहिवासीयांना हाताला काम नसून यांच्या रोजगाराचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आज ही इथला आदिवासी बांधव हक्काच्या रोजगारापासून वंचित आहे. मात्र लोकप्रतिनिधी यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. येथील तरुण पावसाळ्यात कणसे, चहा विकून आपला कुटूंब उदरनिर्वाह करीत आहेत. तर उन्हाळी रानफळे यांच्या रोजगाराचा आधार ठरतात. शैक्षणिक प्रवाहापासून येथील गावपाडे कोसो दूर भासत आहेत. मात्र याबाबत कोणीही आवज उठवायला धजत नाहीत, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
"गावाकडे रोजगाराच्या कोणत्याही सोयी नसल्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय. हाताला दुसरे काम नसल्याने घाटात मका, चहा, मॅगी विकून आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत."
-अनिल बांगडे, सावर्णे (चहा, कणस विक्रेता)
![]() |
कणस विक्रेते, माळशेज घाट |
1 Comments
Play begins after the supplier has cleared off all dropping bets and paid all winners from the earlier spin. Players are given time to place down bets by placing chips on the layout earlier than the supplier begins the spin. After the spin has begun, players may keep betting until 1xbet korea the ball is about to drop from the track at the high of the wheel down toward the numbered slots. The best approach to learn how to to|learn to} play and get your best possibilities to win at roulette on-line is to start out|to begin} from the freeplay choice. If do not know|you do not know} the place to get some free roulette motion, I created a list of the best websites that combine free and actual cash roulette games.
ReplyDelete