#ब्रेकिंग Murbad Lockdown Update : मुरबाड मधील अत्यावश्यक दुकानांवर बंधने
वाचा फक्त 'एवढेच' तास राहणार 'ही' दुकाने चालू...
KISHOR K. GAIKWAD
मुरबाड (दि. १८) : मुरबाड तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुरबाड तहसिल प्रशासनाने उद्यापासून अत्यावश्यक गरजेतील दुकानांच्या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचे निर्णय घेतले आहे.
मुरबाड तालुक्यात कोरोना संक्रमित रूग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत असून याबाबत दिनांक १३ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार स्थानिक प्रशासनाला सदरील परिस्थितीनुसार दुकाने चालु ठेवण्याच्या वेळा निर्धारित करणेबाबत दिलेल्या अधिकारांचा वापर करून मुरबाड तहसिल तसेच नगर पंचायत प्रशासनाने उद्या दि. १९ पासून निर्बंध वाढविण्याचा निर्णय उद्यापासून लागू आहे. याबाबत मुरबाड तालुक्यातील व्यापारी दुकानदार यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन पुढील आदेश पारित करण्यात आले आहे.
१. मुरबाड नगरपंचायत क्षेत्र व संपूर्ण मुरबाड तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, चिकण/मटण/मासे दुकाने, फळांची दुकाने, कृषी दुकाने, हॉटेल (केवळ होम डिलिव्हरी) सोमवार ते रविवार (शुक्रवार वगळुन) सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यत सुरु राहतील.
२. मेडीकल सर्व दिवस वेळेच्या बंधनाशिवाय सुरु राहतील.
३. मुरबाड नगरपंचायत क्षेत्र व संपूर्ण मुरबाड तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक दुकाने (मेडीकल वगळता) दर शुक्रवारी पूर्ण बंद राहतील.
४. उपरोक्त निर्धारीत दिवस आणि वेळेव्यतिरीक्त सार्वजनिक ठिकाणी फिरतांना व्यक्ती आढळुन आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
५. वरील आदेशाचा भंग केल्यास संबंधित दुकानदारावरती दंडात्मक कारवाई तसेच दुकान लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्याची कारवाई शासन आदेश दि. १३/०४/२०२१ च्या आदेशानुसार करण्यात येईल. प्रस्तुत आदेश दि. १९/०४/२०२१ पासून ते दि. ०१/०५/२०२१ पर्यंत मुरबाड नगरपंचायत क्षेत्र तसेच मुरबाड तालुक्याचे संपूर्ण ग्रामीण क्षेत्रासाठी लागू राहील.
-किशोर गायकवाड
____________________________________________








0 Comments