प्रतीक्षा संपली : अखेर 'ती' रुग्णवाहिका सेवेसाठी रुजू... [ KISHOR K. GAIKWAD ]

प्रतीक्षा संपली : अखेर 'ती' रुग्णवाहिका सेवेसाठी रुजू... 


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २१) गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाडच्या कोविड सेंटर शेजारी ऊन वारा पाऊस खात उभ्या असलेल्या ऍम्ब्युलन्सला अखेर आज लोकसेवेसाठी मुहूर्त मिळाला असून कोविड काळात रुग्णांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.
Ambulance for Murbad
  
  मुळात लाखोंची जनसंख्या असणाऱ्या मुरबाड (murbad) तालुक्यात १०८ क्रमांकाने उपलब्ध होणारी एम. एच. १४ सी. एल. १३५८ ही एकमेव ऍम्ब्युलन्सला (Ambulance) तालुक्याचा भार वाहत होती. दिनांक ९ जुलै रोजी शासकीय कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले, त्यावेळी आमदार कथोरे यांनी मुरबाडला नवीन ऍम्ब्युलन्स देण्याबाबत घोषणा केली होती. तद्नंतर स्थानिक विकास निधीतून सदर ऍम्ब्युलन्स आली देखील, मात्र तिची आर. टी. ओ. पासिंग आणि प्रसिद्धी स्टिकर नसल्यामुळे तिला रुग्णसेवेसाठी वापरली नव्हती. आज मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकार्पण सोहळा आयोजित करून सदर ऍम्ब्युलन्सचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार कथोरे (MLA Kisan Kathore)  यांनी कार्यकर्त्यांना सोशियल डिस्टनसिंग राखण्याची वारंवार सुचना करून ही फोटोग्राफीच्या हव्यासापोटी कार्यकर्त्यांनी सोशियल डिस्टनसिंगची पुरता पायमल्ली केल्याचे दिसून आले.
Ambulance for Murbad
   सध्या कोरोनाचा कहर पाहता उदघाटन सोहळ्याचा मोह टाळून सदरची रुग्णवाहिका रुग्णसेवेत तात्काळ दाखल करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. कोविड सेंटरचे ही तसेच झाले. निव्वळ राजकिय श्रेयवादातून ट्रामा केयरच्या इमारतीमध्ये अर्धवट कोविड सेंटरचे सेट अप बसवून त्याचे उद्घाटन करून त्याला कोविड केयर सेंटर घोषित केले. मात्र त्यातील बऱ्याचशा त्रुटी अद्यापही पूर्ण झाल्या नसून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने, अर्ज, पत्रव्यवहार करून येथील मागण्या काही अंशी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील राजकीय श्रेयवादाच्या लढाया केव्हा संपणार आणि त्यात भरडत असलेल्या मुरबाडकरांची या जात्यातून केव्हा सुटका होणार? असा सवाल केला जात आहे.
Ambulance for Murbad

(किशोर गायकवाड)
______________________________________________





(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments