अभिष्टचिंतन : विविध सामाजिक उपक्रमांतून आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस साजरा.... [ KISHOR K. GAIKWAD ]|Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....

Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....

अभिष्टचिंतन : विविध सामाजिक उपक्रमांतून आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस साजरा....|Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....

[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड (दि. २०) : दिनांक १९ सप्टेंबर रोजी आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांचा वाढदिवस असल्याने मुरबाड व बदलापूर तालुक्यातील कार्यकर्ते दरवर्षी तो उत्सव म्हणून साजरा करीत असतात.

  सध्या देशावर कोरोनाचे संकट असल्याने यंदाचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांनी दिनांक १४ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. असे असले तरी बदलापूर - मुरबाड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आमदार कथोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून ठिकठिकाणी साजरा केला.
Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....

Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....
  
  देवा ग्रुप फाउंडेशनचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष तथा आमदार कथोरे साहेबांचे कट्टर समर्थक मनोज रमेश देसले यांच्या वतीने मुरबाड शहरातील वॉर्ड क्रमांक दोन येथील आदिवासी वस्तीमध्ये मोफत आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविण्यात आला. येथील नागरिकांना मोफत औषधोपचार, मास्क व सॅनिटायजचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण कोरोना काळात मोफत तपासणी करून औषधोपचार केले जाईल, असे आश्वासन ही देसले यांनी दिले आहे. त्यामुळे या वाडीतील आदिवासी बांधवांकडून देसले यांचे आभार मानले जात असून आमदार कथोरे (MLA Kisan Kathore) यांना शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. 

Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....

Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....
  
Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....
  
   तर नगरसेविका साक्षी संतोष चौधरी यांनी भाजपा मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव, भाजपा ठाणे जिल्हा ग्रा. महिला आघाडी अध्यक्षा शीतल दिनेश तोंडलीकर, भाजपा ठाणे जिल्हा ग्रा. सरचिटणीस नितिन मोहपे, भाजपा मुरबाड शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे, भाजपा कार्यकर्ते प्रसाद पोतदार, संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत मुरबाडमधील शासकीय कोविड केअर सेंटरमधील रुग्ण तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या सुविधेकरीता वाय-फाय सेवा सुरू केली असून कोविड सेंटरमध्ये एक मोठा एल. इ. डी. टिव्ही. ही बसविण्यात आला आहे. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोविड केअर सेंटर मधील डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंद यांचा यथोचित सन्मान ही करण्यात आला. त्यामुळे या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले जात आहे.
Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....
 
Celebrating the birthday of MLA Kisan Kathore through various social activities ....
 
   तर आमदार कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड पंचायत समिती (Murbad Panchayat Samiti) तर्फे मुरबाड तालुक्यात मोफत मास्क वाटप करण्यात आल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ व उपसभापती अरूणा खाकर यांनी सांगितले. तसेच माळगटातील बुरसुंगे, शाई, शेलगाव, मांदोशी, वनोटे, खेड अशा अनेक गावांमध्ये शेवगा, खैर, पेरू, बांबू, साग अशा अनेक प्रकारच्या रोपांचे वाटप करून व वैशाखरे गटात चप्पलांचे वाटप करून विविध कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांचा वाढदिवस साजरा केल्याचे आमदार समर्थक रघुनाथ खाकर यांनी सांगितले.
   
   त्यामुळे कोरोना काळात ही कार्यकर्त्यांनी आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला असून सोशियल मीडियाद्वारे आमदार कथोरे यांच्यावर मोठ्याप्रमाणात शुभेच्छांंचा वर्षाव केला आहे.

(किशोर गायकवाड)
______________________________________________

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments