ग्रामीण भागातील रुग्णांना डॉ. घुडे यांचा मदतीचा हात...
मदतीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन!
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : गेल्या काही महिन्यांपासून मुरबाड तालुक्यात कोरोना साथीचा फैलाव झपाट्याने वाढल्याने ग्रामीण भागातील लोक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी तालुक्यातील उंबरपाडा - सरळगावचे भूमिपुत्र डॉ. तेजस दिगंबर घुडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
डॉ. तेजस घुडे हे ठाणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सल्लागार म्हणून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत आहेत. तसेच आरोग्यम या खाजगी कोविड रुग्णालयात ही रुग्णांवर उपचार करत असून ठाणे येथील रोहिणी रूग्णालय येथे छातीच्या रोगावर तज्ञ (Chest Physician) म्हणून काम करतात.
ग्रामीण भागात कोविड संसर्ग झालेल्या आजवर अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत व सल्ला पाहिजे असल्यास त्यांच्या 9372304908 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना आता दिलासा मिळणार आहे.
(किशोर गायकवाड)
______________________________________________

0 Comments