#Truth_Revealed : महामार्ग अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचे सत्य चव्हाट्यावर? जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरक्षित करा! -चेतनसिंह पवार [ KISHOR K. GAIKWAD ]

Chetansingh Pawar

#Truth_Opened : महामार्ग अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याचे सत्य चव्हाट्यावर? 

 जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरक्षित करा! -चेतनसिंह पवार 

[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : ( दि. २४ ) मुरबाड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वर सद्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत चालले असून याबाबत काँग्रेस पक्षातर्फे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

 लॉकडाउनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात मंदावली असतांना आता अनलॉक प्रक्रियेमुळे पुन्हा पूर्वपदावर येत आहे. अशातच खड्ड्यांमुळे या महामार्गाची पुरता दुरवस्था झालेली नजरेस पडत असून दुचाकी स्वारांना याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

Chetansingh Pawar
Chetansingh Pawar

  याबाबत काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधून कल्याण-अहमदनगर महामार्गावरील मुरबाड ते उमरोली (पि.) रस्त्यावरील खड्ड्यांची व्यथा मांडून तात्काळ बुजविण्यासाठी ईमेल द्वारे निवेदन दिले आहे. त्यामुळे एवढे मोठमोठे खड्डे या महामार्गावर पडले असतांना मुरबाडचे महामार्ग अधिकारी नेमके कोणत्या पाहणी दौऱ्यावर असतात? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

Potholes on road
Potholes on Road on NH6
  
  हल्ली तालुक्यात कोरोनाचा थैमान वाढला असतांना मुरबाडकर व अन्य प्रवासी वाहतूकीच्या या दुहेरी संकटाला झुंज देतांना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे एखादी अनपेक्षित हानी घडण्याची दाट संभावना असल्याने तात्काळ हे जीवघेणे खड्डे बुजविण्यात यावे, अशी लोकहितार्थ मागणी या निवेदनात पवार यांनी केली आहे. 
  
   राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मुरबाडमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा अपघात प्रवण महामार्ग म्हणून नेहमीच चर्चेत असतो. दरवर्षी कोट्यवधींचा निधी या महामार्गावर खर्च होत असतांना या महामार्गावरील अपघातांची मालिका थांबायचा नाव घेत नाही. त्यामुळे या असुरक्षित महामार्गाच्या दुरावस्थेला एकमेव महामार्ग विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
Chetansingh Pawar

(किशोर गायकवाड)
______________________________________________

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments