मोठा खुलासा : 'ती कमानी आम्ही बांधलेली नाही किंवा बांधण्याची परवानगी ही दिलेली नाही' -नगर पंचायत, मुरबाड
मुरबाड शहराच्या कमानीचा वाद पोहचला पोलिस ठाण्यात...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १८) सुमारे ३ वर्षांपासून नामकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुरबाड शहराच्या प्रवेशद्वार कमानीचा वाद चांगलाच चिघळला असून याबाबत नगर पंचायत प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे.
शनिवारी स्वातंत्र्यदिनी सकाळी या कमानीचे मुरबाड नगर पंचायतीचे नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या उपस्थितीत आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदर कमानीवर 'महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार' या नावाचे फलक लावलेले दिसून आल्याने मुरबाडच्या जनतेला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप करीत आरपीआय आठवले गटाने याविरोधात तिव्र विरोध दर्शवून राष्ट्रीय महामार्ग ६१ वर तिनहात नाका येथे रास्तारोको केला होता. मात्र मुरबाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलकांनी रास्ता खुला करून मुरबाड पोलिस स्टेशनला जाऊन रितसर जबाब नोंदवला व सदर नामफलक न उद्या बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सदर प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्याबाबतचे निवेदन सादर केले होते.
त्यावर सदर कमान/प्रवेशद्वार मुरबाड नगर पंचायतने बांधलेली नाही किंवा तशी परवानगी ही दिलेली नसल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या सहीचे पत्र काल आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे सदर कमानीवरील 'महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार' हे नाव त्वरित हटवून त्याठिकाणी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचे नाव देण्यात यावे अन्यथा उद्या बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सदर कमानी समोर रिपाई आठवले गटाकडून तिव्र आंदोलन केले जाईल, अशा आशयाचे पत्र काल मुरबाड पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे. याबाबत संबंधित प्रशासन आता काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष वेेधले आहे.
( किशोर गायकवाड )
______________________________________________
[ प्रवेशद्वाराच्या नावाने मुरबाड नगरपंचायतीची पंचाईत - बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |



0 Comments