वाचा : मुरबाडच्या गणेशोत्सव मंडळांनो यंदा 'या' १६ सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार
'आरतीला आणि विसर्जनाला पाच पेक्षा जास्त लोक नसावेत'
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १७) कोरोनाचे सावट पाहता काही दिवसांवर येत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुरबाड पोलीस स्टेशन तर्फे मुरबाड शहरातील नमस्कार हॉल येथे गणपती उसत्व मंडळांना आज कायदेशीर मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले होते.
यावेळी मुरबाड तालुक्यातील सार्वजनिक आणि घरगुती श्रीगणेशोत्सव साजरा करणेबाबत मुरबाड पोलीसांनी विषय नियम आणि सूचना केल्या आहेत. या नियमांचे आणि सूचनांचे पालन करून यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
१) सार्वजनिक श्रीगणेशोत्सव दीड किंवा अडीच दिवसाचा करण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त नसावी. शक्यतो दोन दिवस आधीच मुर्ती आणावी.
२) कुणीही बाहेरील पाहुणा बोलावू नये. जेवणावळ, भंडारा ठेवू नये.
३) नातेवाईक बोलावू नये. घरगुती पद्धतीने आणि स्थानिक पातळीवर कार्यक्रम करावेत.
४) आपणही कुठे पाहूणे म्हणून दर्शनासाठी जाऊ नये.
५) आगमनावेळेस दोन लोकांनी मुर्ती आणावी. आगमन मिरवणूक काढू नये.
६) आरतीला पाच पेक्षा जास्त लोक नसावेत.
७) कोणताही मोठा अथवा बाहेरचा कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच दर्शन रांग न लावता सोशल मिडियाच्या माध्यमातून दर्शन व्यवस्था करावी.
८) विसर्जन मिरवणूक काढु नये.
९) संध्याकाळ होण्याच्या आत विसर्जन करावे.
१०) अंधारात चाचपडत विसर्जन करू नये.
११) विसर्जन शक्यतो कृत्रिम तलाव करून करावे.
किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी विसर्जनाला जाऊ नये. महिला, लहान मुलांना बरोबर नेवू नये.
१२) विसर्जनावेळीची आरती घरीच करावी.
१३) विसर्जन स्थळी आरती करू नये.
१४) जुगार, भांडणात सापडलेल्या लोकांची गय केली जाणार नाही.
१५) गौरी विसर्जन करताना महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
१६) लहान मुलांना बरोबर नेवू नये.
या शिवाय उत्सवकाळात वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोनाने सन २०२० सालामधील सर्व सणांवर संक्रात आणली असल्याने नागरिकांना अनेक बंधनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्रद्धेतून साजरा करायाचा आहे.
( किशोर गायकवाड )
______________________________________________
[ आलम साहेब तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल... ]
[ प्रवेशद्वाराच्या नावाने मुरबाड नगरपंचायतीची पंचाईत - बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]

0 Comments