संतापजनक : मुंबईची अधिकृत निर्मिती करणाऱ्या नाना शंकरशेठ यांचे मुरबाडमध्ये अनाधिकृत स्मारक - [ KISHOR K. GAIKWAD ]

संतापजनक : मुंबईची अधिकृत निर्मिती करणाऱ्या नाना शंकर शेठ यांचे मुरबाडमध्ये अनाधिकृत स्मारक

[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १५) अवघी मुंबई अधिकृतपणे उभारणारे मुरबाडचे भूमिपुत्र दिवंगत नाना शंकरशेठ यांच्या अनाधिकृत स्मारकाचे बांधकाम करून उद्घाटन केल्याचा संतापजनक प्रकार मुरबाड शहरात घडला आहे.

  आपल्या अनधिकृत बांधकामांसाठी राज्यात कुप्रसिद्ध असणारी मुरबाड नगर पंचायत ही प्रवेशद्वार व नाना शंकरशेठ स्मारक यांच्या उद्घाटनामुळे पुन्हा वादग्रस्त चर्चेत आली आहे.  
  
  राष्ट्रीय महामार्ग ६१ लगत असणारा मुरबाड शहराचा प्रवेशद्वार अर्थात दुर्गंधीचा हॉटस्पॉट मानला जातो. याठिकाणी सांडपाण्याचा मोठा नाला आहे.  या नाल्याच्या अर्ध्याभागात भराव टाकून अवघ्या दोन दिवसांतच शंकरशेठ यांचे अर्धवट स्मारक उभारून आज स्वातंत्र्यदिनी आमदार किसन कथोरे हस्ते मुरबाड नगर पंचायतचे नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत संशयितरित्या उद्घाटन करण्यात आले. 
  
  नाना शंकरशेठ हे मुरबाडकरांचे आदर्श आहेत. त्यांचा भव्यदिव्य स्मारक होवा अशी अपेक्षा मुरबाडकरांची असतांना आज जलदगतीने नाना शंकरशेठ यांचे चक्क अनधिकृत अर्धवट स्मारक उभारून उद्घाटन केल्याने मुरबाडकरांच्या भावना दुखावल्या असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
  
  'हम करे ओ कायदा' हेच या मनमानी मुरबाड नगर पंचायत पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे आपल्या पदाचा गैरफायदा करणाऱ्या नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींवर कारवाई होईल का? असा सवाल केला जात आहे.
  
  याबाबत मुरबाड नगर पंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता, सदर बांधकाम नगर पंचायतने केलेले नसून नगर पंचायतशी याचा संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांना त्यांची गैरहजेरी दिसल्याचे बोलले जाते.

  "सदर बांधकामाशी आपल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचा काहीही संबंध नसून नगर पंचायत हद्दीतील अतिक्रमण हटवणे हे नगर पंचायत प्रशासनाचे काम असते."
      -सुनील पाटील, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, मुरबाड

( किशोर गायकवाड )

______________________________________________

 आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]


Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407


______________________________________________


Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments