प्रवेशद्वाराच्या नावाने मुरबाड नगरपंचायतीची पंचाईत - नामफलक बदला अन्यथा आंदोलन -रिपाई - [ KISHOR K. GAIKWAD ]


प्रवेशद्वाराच्या नावाने मुरबाड नगरपंचायतीची पंचाईत

नामफलक बदला अन्यथा आंदोलन -रिपाई

[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १५) मुरबाड शहरातील अनाधिकृत व्यापारी बाजारपेठेचा मुद्दा वादग्रस्त असतांना आज स्वातंत्र्यदिनी नव्या वादाला तोंड फुटले आहे.

   मुरबाड नगर पंचायत स्थापनेनंतर मुख्य बाजारपेठेत अनाधिकृत पक्क्या व्यापारी गाळ्यांची मालिका राजरोसपणे उभी राहिली. त्यासोबत मुख्य बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर एक भव्य कमानी उभारण्यात आली. मात्र या कमानीच्या नामकरणाबाबत आजवर अनेक वादंग उभे राहिले. 
  सदर कमानीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नाना शंकरशेठ अशी नावे देण्याबाबत मागणी होत असतांना काल रात्रीच्या दरम्यान या कमानीवर 'महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार' हे फलक लावून आज स्वातंत्र्यदिनी सकाळच्या दरम्यान आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी गैरहजेरी लावली.
  
  त्यामुळे मुरबाड नगर पंचायत नव्या वादात सापडली असून याविरोधात आरपीआय (आ) तर्फे तिनहात नाका येथे दुपारी रास्तारोको करण्यात आला. तसेच बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी सदर प्रवेशद्वारा समोर आंदोलन करून मुरबाड बाजारपेठ बंदचे आवाहन केल्याचे निवेदन मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये सादर करण्यात आले आहे.
  
  "सदर कमानी नगर पंचायतीच्या मालकीची नसून आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाशी मुरबाड नगर पंचायत प्रशासनाचा संबंध नाही"
   -परितोष कंकाळ, मुख्याधिकारी, नगर पंचायत मुरबाड

( किशोर गायकवाड )
___________________________________________

आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]


Creative Science Hub - Murbad
Creative Science Hub - Murbad

Zoom online lectures are started. Dont  miss the chance to enroll yourself.

To Enroll Contact on Below Number
8308922200 / 9404139039 / 8779945407


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments