-[ किशोर गायकवाड ]
आकाशात अधिराज्य गाजवणारे उंचच उंच वनश्रीने नटलेले हिरवेगार कडे आणि त्यावरून शुभ्र धवल कोसळणारे धबधबे, ही माळशेजची ओळख सर्वश्रुत आहे. सह्याद्रीच्या रांगेत स्थित असलेला माळशेज घाट ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात येतो. याच घाटातून काळू नदीचा उगम झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड भागातून येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच येथे वर्दळ पहावयास मिळते. घाटात पोहचण्यासाठी पूर्णपणे रस्ता वाहतूकीवरच अवलंबून राहावे लागते. तर खाजगी वाहतूक खेरीज परिवहन मंडळाच्या ही बसेसचा राबता यामार्गे अविरत असतो. त्यामुळे येथे येण्या जाण्याच्या सोयींचा तुटवडा नाही. तर राहण्याच्या ही उत्तम सोयी आहेत. हॉटेल्स सह घाट माथ्यावर एम. टी. डी. सी. चे सुसज्ज असे रिसॉर्ट आहे.
याच घाट माथ्याच्या परिसरात पावसाळ्यात उलटे धबधबे पहायला मिळतात. अर्थात हवेचा प्रवाह इतका तेज असतो की, माथ्यावरचे धबधबे खाली कोसळण्या ऐवजी पुन्हा वरच्या दिशेने येतांना पाहावयास मिळतात.
घाटाच्या माथ्यावर ठाणे जिल्ह्याची हद्द समाप्त होऊन पुणे जिल्ह्याची हद्द सुरू होते. या हद्दीवरील खुबी गावाजवळ पिंपळगाव जोगा धरणाच्या सुंदर विस्तीर्ण जलाशयाचे दर्शन घडते. या जलाशयाची विशेष ओळख म्हणजे पावसाळ्यात येथे येणारे सैबेरियातील ’रोहित पक्षी’ (फ्लेमिंगो बर्ड). हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयाच्या सानिध्यात येत असतात. रंगाने आणि आकारमानाने हे लक्षवेधी असतात. यांना नजरेस भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने पक्षीप्रेमी येथे उपस्थित उपस्थित राहून मनसोक्त आनंद लुटतात.
मात्र याच माळशेजची प्रतिमा हल्ली धोकादायक म्हणून प्रचलित होत चालली आहे. पर्यटनाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट झाली. वाहतुकीच्या सुरक्षितते हेतू संरक्षण कठडे बांधले गेले. परंतु वाहतूक सुरक्षित झाली का? हा सवाल जैसे थे आहे. तसा पावसाळा चार महिन्यांचा; मात्र या चार महिन्यांत दरड कोसळण्याच्या घटनेचे गुणोत्तर वाढते आहे. कोट्यवधी रुपये खर्चून ही सुरक्षित वाहतूक व पर्यटनाची हमी देण्यास असमर्थ असणाऱ्या प्रशासनाचा अपयश म्हणावा लागेल अथवा भ्रष्टाचार? पर्यटन स्थळाचा दर्जा लाभलेल्या या माळशेज घाटातील अपघातांची मालिका पाहता माळशेज स्वतःच आपल्या वेदना व्यक्त करत दिलेला दर्जा रद्द करण्याची मागणी करत असल्याचे भासत आहे.
ज्या घाटातून कोकणात-देशात जाण्या-येण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, त्याठिकाणी पारदर्शक वॉक-वे असावा असे प्रयोजन आहे. हजारो फूट खोल दरीवर सुमारे १८ मीटर लांबीच्या वॉक-वे वरुन चालतांना पर्यटकांना हवेत चालण्याचा चित्तथरारक अनुभव घेता यावा यासाठी पुन्हा कोट्यवधींची धडपड. मात्र यामार्गे प्रवास करतांना दैनंदिन चित्तथरारक अनुभव घेत असलेल्या वाहनचालक, प्रवासी यांना वॉक-वे चे किती कौतुक असेल? हा सवाल गंभीर म्हणावा लागेल. मुळात देशातील पहिला वॉक-वे मुरबाडमध्ये होत असेल तर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचा आनंद निश्चितपणे संपूर्ण तालुकाभर पहावयास मिळेल. परंतु त्याआधी वॉक-वे पर्यंत वाहन व पर्यटक सुखरूप पोहचण्याचे यशस्वी नियोजन होणे गरजेचे नाही का? या यक्ष प्रश्नाचे समाधान होणे अनिवार्य आहे.
एकंदरीत सद्यास्थितीला माळशेजचे रूप बघता माळशेजला भ्रष्टाचाराचे कुरण बनविल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. संवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधींची होत असणारी लूट थांबता थांबत नाही. या भ्रष्ट साखळीच्या गराड्यातून माळशेजला वाचण्यासाठी नागरिकांनाच स्वतः दोन पाऊल पुढे येऊन माळशेजला धूर्त ठेकेदार, अधिकारी माफियांकडून वेळेत वाचवावे लागेल. अन्यथा येत्या पिढीला माळशेजच्या सौंदर्यास मुकावे लागेल, हे सत्य नाकारता येणार नाही.
_____________________________________________
_____________________________________________
मेगा भरती
मुरबाड मधील नामांकीत कंपनीसाठी मुले -मुली कामासाठी हवे आहेत .
- शिक्षण - 10 वी उत्तीर्ण
- पगार - रु. 9400(आठ तास)
रु. 14146(बारा तास ) - पी. एफ. -10%
- ई. एस. आय. सी. - 3%
- बस सेवा - रु. 500 (टोकावडे, म्हसा, किंन्हवली, कल्याण येथून उपलब्ध आहेत)
- मेस उपलब्ध
संपर्क
सचिन - 7768041858
चंद्रकांत - 9225158410
रविंद्र - 9764069717/9272724111
____________________________________________
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)



0 Comments