![]() |
मुरबाड : १८ वर्षीय युवकाचा सर्पदंशाने मृत्यू
[ किशोर गायकवाड ]
मुरबाड : (दि. २२) मुरबाड तालुक्यातील खेडले तळवली गावातील एका अठरा वर्षिय युवकाचा संर्पदंशाने मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली मंगळवारी आहे.
प्रमोद हिरामण खापरे असे या मृत पावलेल्या युवकाचे नाव असुन नुकताच त्याने इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतून ६० टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले होते.
नेहमीप्रमाणे मंगळवारी प्रमोद निवांत झोपेत असतांना रात्री दिडच्या सुमारास त्याला सर्पदंश झाल्याचे जाणवले. सदर साप हा मन्यार नामक विषारी साप असल्याचे बोलले जात आहे. सर्पदंश झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी प्रमोदला उपचारासाठी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. काही वेळ तेथे उपचार करण्यात आले. मात्र प्रमोदची प्रकृती बिघडत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले. मात्र काही तासांनी त्याला तेथून ही पुढे कळवा येथे जाण्यास सांगितले. या दरम्यान कळवा हॉस्पिटलच्या गेट समोरच प्रमोदची प्राणज्योत मावळ्याचे समजले.
गावातील अत्यंत हुशार, ध्येयवादी व जिद्दी मुलगा म्हणून प्रमोदची ओळख होती. महाराष्ट्र पोलिस सेवेत सहभागी होण्याचा त्याचा ध्येय होता. परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होते. प्रमोदच्या पश्चात त्याचे आईवडील, मोठा भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
_____________________________________________
_____________________________________________
मेगा भरती
मुरबाड मधील नामांकीत कंपनीसाठी मुले -मुली कामासाठी हवे आहेत .
- शिक्षण - 10 वी उत्तीर्ण
- पगार - रु. 9400(आठ तास)
रु. 14146(बारा तास ) - पी. एफ. -10%
- ई. एस. आय. सी. - 3%
- बस सेवा - रु. 500 (टोकावडे, म्हसा, किंन्हवली, कल्याण येथून उपलब्ध आहेत)
- मेस उपलब्ध
संपर्क
सचिन - 7768041858
चंद्रकांत - 9225158410
रविंद्र - 9764069717/9272724111
___________________________________________________________________________________
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)



0 Comments