मुरबाड : डोंगरन्हावे गावात बिबट्याच्या वावराची चर्चा..! - पहा : वन्य श्वापदाच्या पाऊल खुणांचे फोटो - 'त्या' ठस्यांचे फोटो तज्ज्ञांकडे रवाना... - [ किशोर गायकवाड ]


    (वन विभागाने काढलेला फोटो)

           
   

मुरबाड : डोंगरन्हावे गावात बिबट्याच्या वावराची चर्चा..!


पहा : वन्य श्वापदाच्या पाऊल खुणांचे फोटो

'त्या' ठस्यांचे फोटो तज्ज्ञांकडे रवाना...

[ किशोर गायकवाड ]

मुरबाड : (दि. २५) मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे गावात आज बिबट्याच्या वावराची चर्चा असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

   आज सकाळी डोंगरन्हावे गावातील शेतकरी तुकाराम खुणे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांच्या बेड्या जवळ गेले असता त्यांना आपल्या बेड्या जवळ बिबट्या सदृश पाऊलांचे ठसे नजरेस पडले व जवळच अंगावर जखमा असलेली एक मांजर ही मृत अवस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती आणि फोटो खुणे यांनी शब्द मशालला पाठवले व तद्नुसार शहानिशा करण्यासाठी संबंधित वन विभागाला कळविण्यात आले. 
   
  माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. सदर पाऊल खुणा या बिबट्याच्या नसून तरस या वन्य प्राण्याच्या असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच सदर श्वापदाने छोटी शिकार केली असून बिबट्या शक्यतो छोटी शिकार करीत नाही. मात्र बिबट्याचा वावर असल्यास गावकऱ्यांनी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी? याबाबत वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना ही गावकऱ्यांना समजावून सांगण्यात आल्या आहेत. तसेच सदर पायांच्या ठस्यांचे फोटो काढून तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहेत. पुढे काही दिवस वन खात्याकडून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरून न जाता काही धोका जाणवल्यास वन विभागाला कळवावे अशा सूचना वन परिक्षेत्र अधिकारी विकास भामरे यांनी शब्द मशालच्या माध्यमातून गावकऱ्यांना केल्या आहेत.

___________________________________________________________________________

           मेगा भरती

मुरबाड मधील नामांकीत कंपनीसाठी मुले -मुली कामासाठी हवे आहेत .

  • शिक्षण - 10 वी उत्तीर्ण 
  • पगार - रु. 9400(आठ तास)
               रु. 14146(बारा तास )
  • पी. एफ. -10%
  • ई. एस. आय. सी. - 3%
  • बस सेवा - रु. 500 (टोकावडे, म्हसा, किंन्हवली, कल्याण येथून उपलब्ध आहेत)
  • मेस उपलब्ध
संपर्क 
सचिन - 7768041858
चंद्रकांत - 9225158410
रविंद्र - 9764069717/9272724111
___________________________________________________________________________________

[ मुरबाड : कोरोना अपडेट्स... मृतांच्या संख्येत वाढ... वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]

आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)   


0 Comments