बापरे : मुरबाडची कोरोना प्रेते कल्याणच्या स्मशानात... - कोविड सेंटर झाले मात्र प्रेत दहनाचे काय?- [ किशोर गायकवाड ]

बापरे : मुरबाडची कोरोना प्रेते कल्याणच्या स्मशानात... 

कोविड सेंटर झाले मात्र प्रेत दहनाचे काय? 

मृत्यू नंतरही मरणयातना संपेना... 

[ किशोर गायकवाड ]

मुरबाड : (दि. २८) मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना मृतांच्या संख्येत ही वाढ होत आहे. मात्र या प्रेतांना मुरबाडमध्येच दहन करण्याचा गंभीर प्रश्न अद्यापही खितपत पडला आहे.

    मुरबाडमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल घेऊन मागणीनुसार मुरबाड शहरातील ट्रामा केयर सेंटरचे उद्घाटन करून त्यास कोविड सेंटर बनविण्यात आले आणि त्याठिकाणी कोविड ग्रस्त रुग्णांवर उपचाराला सुरुवात झाली. तसेच त्याच दिवशी शहरात खाजगी कोविड सेंटरचे ही उद्घाटन करण्यात आले. ही बाब मुरबाडकरांसाठी दिलासादायक असली तरी एकंदरीत मुरबाडमधील मृतांची आकडेवारी पाहता त्यांच्या दहन प्रक्रियेबाबत विचारविनिमय होणे आवश्यक होते. 

    तालुक्यातील कोरोना मृतांची संख्या ८ वर येऊन पोहचली आहे. मृत पावलेले शव दहन करण्यासाठी कल्याण, उल्हासनगर, बदलापूरकडे न्यावे लागतात. त्यांचा खर्च ही अधिक असतो. शववाहिनीचा भाडा, स्मशानभूमीची तरतूद, प्रेताची उचलठेव करणाऱ्यांची मजुरी, त्यांना पीपीई किट अशा विविध बाबींमुळे सुमारे १४ हजार रुपयांपर्यंत एका प्रेताला दहन करण्याचा खर्च लागल्याची माहिती मुरबाड शहरातील एका कोरोना मृताच्या नातेवाईकानी दिली आहे. तसेच मुरबाडची कोरोना मृतदेह मुरबाड बाहेर दहनासाठी पाठवली जात असल्याने मृतांच्या कुटुंबियांना दुरून का होईना, त्यांच्या अंत्यदर्शनास ही मुकावे लागल्याची वेळ त्या दुःखी नातलगांवर ओढवली गेली आहे. 

  त्यामुळे मुरबाडमध्ये कोरोनाने मृत पावणाऱ्यांच्या दहनकार्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगर पंचायतशी संपर्क साधला असता, प्रेतं स्मशानभूमी पर्यंत नेण्याची सोय, सरणाचा लाकूडफाटा, प्रशिक्षित मनुष्यबळ व अन्य खर्चाची जबाबदारी तसेच दक्षता व हमी संबंधित कोविड केयरच्या प्रशासनाने घेतल्यास शहारा बाहेरील स्मशानभूमीमध्ये प्रेतं दहन करण्याची परवानगी देण्याबाबत नगर पंचायत सकारात्मक विचार करायला तयार असल्याचे मुरबाड नगर पंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी शब्द मशालशी बोलतांना सांगितले.  
  
  त्यामुळे जर स्थानिक प्रशासनाने वेळीच ही उपाययोजना केल्यास कोरोना प्रेतांच्या दहनाचा गंभीर प्रश्न मार्गी लागला जाऊ शकतो. मात्र संबंधित प्रशासन ही बाब किती गांभीर्याने घेते? हे पाहणे मुरबाडकरांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.
_____________________________________________





_____________________________________________

 मेगा भरती

मुरबाड मधील नामांकीत कंपनीसाठी मुले -मुली कामासाठी हवे आहेत .

  • शिक्षण - 10 वी उत्तीर्ण 
  • पगार - रु. 9400(आठ तास)
               रु. 14146(बारा तास )
  • पी. एफ. -10%
  • ई. एस. आय. सी. - 3%
  • बस सेवा - रु. 500 (टोकावडे, म्हसा, किंन्हवली, कल्याण येथून उपलब्ध आहेत)
  • मेस उपलब्ध
   संपर्क 
सचिन - 7768041858
चंद्रकांत - 9225158410
रविंद्र - 9764069717/9272724111
____________________________________________

आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]

Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments