मुरबाड : ग्रामपंचायतीच्या राखीव निधीने दिला दिव्यांगांना आधार..!
धान्याचे किट देण्याची केली होती मागणी...
[ किशोर गायकवाड ]
मुरबाड : (दि. ३१) दिव्यांगांच्या जमा ५ टक्के रक्कमेतून धान्य किट वाटप करण्याचा उपक्रम मुरबाड तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतमध्ये आज राबविण्यात आला.
प्रत्येक ग्रामपंचायतीमधील वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम ही सदर ग्रामपंचायत श्रेत्रातील दिव्यांगांच्या अधिकाराची असते. आर्थिक वर्षा अंती ती दिव्यांगांच्या विकासा करिता खर्च करणे बंधनकारक असते. मात्र देवगाव ग्रामपंचायतीमधील अपंगांच्या मागणी खातीर सद्यस्थितीला दिव्यांगांच्या ८,५०० रुपये एवढ्या जमा निधीतून आज त्यांना धान्याचे किट वाटप करण्यात आले आहे.
दीर्घकाळ सुरू राहिलेल्या लॉकडाउन काळामध्ये रोजगारा अभावी शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणाऱ्या व्यक्तींवरच उपासमारीची वेळ ओढवली आहे; त्यात शारीरिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती बितली असेल? असा विचार अनेकांना पडला असावा.
कोरोनाने माजवलेल्या हाहाकारामुळे अनेकांचा रोजगार संपुष्टात आला असतांना याची सर्वाधिक झळ दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबावर पोहचली आहे. अशाच बिकट परिस्थितीशी सामना करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या १७ दिव्यांग व्यक्तींना आज त्याचा योग्य लाभ मिळाला आहे.
मुरबाड तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग ग्रामस्थांनी त्यांच्या हिस्स्याच्या दरवर्षी खर्च होणाऱ्या रकमे पैकी सद्या जमा असलेल्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांना धान्य किट वाटप करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना केली होती. सदर मागणी मान्य करत आज देवगाव ग्रामपंचायतीने सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व कर्मचारी यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना धान्याचे किट वाटप केल्याचे ग्रामसेवक शहाजी नरुटे यांनी सांगितले. यामुळे या दिव्यांगांना काही प्रमाणात आधार मिळाला असून सदरचा उपक्रम हा मुरबाड तालुक्यात प्रथम ठरला आहे.
_____________________________________________
_____________________________________________
_____________________________________________
[ ITI मध्ये प्रवेश सुरू बाबतची जाहिरात ]
_____________________________________________
_____________________________________________
![]() |
| _____________________________________________ |
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)
![[ग्रामपंचायत, देवगाव] shabd mashal murbad](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiROqdFWuOuyRZ1BDp8DxA1DOkc1BKoB-RiaFBPyJ77Sv-Oq1gj1gj5I-8veOb7Wi4nmglwnBM4NcQefe_59qnCmYvC-ACDX3j0gOhEMlVPfq4VmvR9C2jQYO-QYUbpYkVXeDPCBmoITJ0/w640-h361-rw/1596216472373598-0.png)


0 Comments