मोरया : सरपंच पदाच्या नवसाला पावलेल्या बाप्पाचे विसर्जन! [ Shabd Mashal -Kishor Gaikwad ]

मोरया : सरपंच पदाच्या नवसाला पावलेल्या बाप्पाचे विसर्जन!

सरपंच पदप्राप्तीसाठी थेट माघी गणपतीला केले ग्रामस्थांनी नवस

Maghi Ganpati Navas

[ Kishor K Gaikwad
MURBAD
मुरबाड : (दि. १६) राजकीय रिंगणात यश प्राप्तीसाठी आपल्या ग्रामदेवता, कुलदेवता, इष्टदेवता यांची कृपा आपल्यावर व्हावी, यासाठी काही राजकीय मंडळी, गावकरी विविध प्रकारचे साकडे, नवस करीत असतात. त्यानुसार काहींना यशप्राप्ती होते तर काहींच्या पदरी अपयश येतो. अशाच मुरबाड तालुक्यातील एका गावातील काही महिलांनी केलेल्या नवसाला बाप्पा पावला असून त्यानिमित्ताने गावात माघी गणेशोत्सवाचे आयोजन केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

 'आमचीच उमेदवार गावची सरपंच व्हावी' म्हणून तालुक्यातील जांबूर्डे (Jambhurde) गावाच्या गावकऱ्यांनी थेट गणपतीला साकडे घातले होते. तर बाप्पा या गावकऱ्यांच्या नवसाला पावला देखील व गावकऱ्यांनी यंदा पासून ५ वर्षे दीड दिवसीय बाप्पाच्या आगमनाला सुरुवात केली असून काल या दीड दिवसीय बाप्पाचे मनोभावे विसर्जन देखील करण्यात आले आहे. 
Maghi Ganpati Navas
  'श्री समर्थ कृपा' पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविलेल्या सौ. वैशाली प्रकाश भोपी असे जांबूर्डे गावच्या सरपंच पदी विराजमान झालेल्या महिलेचे नाव असून कु. सचिन भालचंद्र बिराडे हे उपसरपंच तर मधुकर सखाराम मार्के सौ. नयना रवींद्र पाटील सदस्य पदी निवडून आले आहेत. नवनिर्वाचित सरपंच वैशाली भोपी यांचे पती प्रकाश भोपी हे जांभुर्डे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. वैशालीच्या सरपंच पदासाठी गावातील काही महिलांनी माघी गणपतीला नवस केले होते व ती सरपंच पदी निवडून देखील आली. त्यामुळे गावातील महिलांनी व अन्य ग्रामस्थांनी श्रद्धेतून दीड दिवसीय गणपतीची स्थापना करून काल मनोभावे विसर्जन ही केले. तर आणखीन ४ वर्षे बाप्पाचे मनोभावे पूजन करणार असल्याचे प्रकाश भोपी यांनी सांगितले. 
Maghi Ganpati Navas

  "बाप्पाच्या शुभाशीर्वादाने गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. गावातील सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी माझ्या गावकऱ्यां समवेत मी गावाच्या हितासाठी शक्य ते प्रयत्न करेन. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासा बद्दल मी माझ्या गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते व कायम ऋणी आहे."
      -सौ. वैशाली प्रकाश भोपी (नवनिर्वाचित महिला सरपंच, जांबूर्डे ग्रा. पं.)

किशोर गायकवाड         
(7038843444)
___________________________________________




(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments