#Stop Construction : ...अन्यथा पोलिसी बंदोबस्ताद्वारे अतिक्रमण काढले जाईल व...
कमानीचे मनमानी बांधकाम करणाऱ्याला ग्रामपंचायत व सा.बां.चा दणका...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : तालुक्यातील कासगव येथे मनमानीपणे कमानीचे बांधकाम केल्या प्रकरणी सा. बां. व ग्रामपंचायतीने एका ठेकेदाराला थेट काम काढण्याची नोटीस धाडल्याचा प्रकार समोर आला आहे.
ग्रामपंचायत, कासगाव हद्दीतील गट क्र. ३७५ या खासगी जागेमध्ये हिस्सेदार मालकाची कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता चक्क मनमानीपणे कमानीचे बांधकाम सुरू केल्याने ग्रामपंचायत, कासगाव व सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मुरबाड यांनी पद्माकर यशवंतराव या पेशाने शिक्षक असलेल्या व्यक्तीच्या नावे नोटीस काढली आहे. याबाबत जागेमध्ये कौटुंबिक वारसदार असलेल्या हिस्सेदार मालकास कळताच त्यांनी संबंधित प्रकार ग्रामपंचायत व अन्य प्रशासकीय कार्यालयांना कळविला. याबाबत दखल घेऊन ग्रामपंचायत, कासगाव यांनी सदर जमीन मालकाचे संमतीपत्र घेतल्याशिवाय बांधकाम सुरू करू नये व सदरचे बांधकाम बंद करावे. तसेच बांधकाम सुरू ठेवल्यास होणाऱ्या नुकसानास आपण स्वतः जबाबदार राहाल, असे पत्र दि. ३ फेब्रुवारी रोजी संबंधित इसमाला दिले आहे.
तर याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन दि. २ फेब्रुवारी रोजी सदर इसमाला अतिक्रमण तात्काळ स्वखर्चाने काढून टाकण्याची सूचना केली आहे. मात्र हे अतिक्रमण न काढल्यास पोलिसी बंदोबस्तचा आधार घेऊन अतिक्रमण काढण्यात येईल व त्यासाठी लागणारा सर्व खर्च ठेकेदाराकडून दंडासहित वसूल करण्यात येईल, असे खडेबोल सदर पत्रात नमूद केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ग्रामसेवक शेलवले यांना मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसिव्ह करण्याचे टाळले असल्याचे दिसून आले. त्यामुळे याप्रकरणी नेमकी काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"संबंधित जागा मालकांचे संमतीपत्र मिळवून सदर कमानीचे काम कायदेशीर तथा मनमोहक करण्यात येईल."
-श्री. तिकाराम पारध, सरपंच कासगाव
"सदर प्रकरणाची रितसर फाईल तयार आहे. शासकीय प्रक्रियेनुसार काम चालू आहे. कायदेशीर प्रक्रिये नुसारच काम पूर्ण केला जाईल."
-श्री. पद्माकर यशवंतराव










0 Comments