भाजपा वॉर्डातील विकास कामांच्या भूमिपूजनाला बंडखोर नगराध्यक्षची हजेरी मुरबाड शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण -Kishor K Gaikwad




भाजपा वॉर्डातील विकास कामांच्या भूमिपूजनाला बंडखोर नगराध्यक्षची हजेरी


मुरबाड शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण


-Kishor K Gaikwad

ठाणे/मुरबाड (दि.२७): (किशोर गायकवाड) मुरबाड शहरातील आदिवासी बहुल लांबाचीवाडी प्रभागात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी प्रभागात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्यासंख्येने ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ठेकेदार उपस्थित होते.



प्रभाग क्र. २ च्या नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा मानसी मनोज देसले व पती मनोज रमेश देसले हे दाम्पत्य नेहमीच आपल्या प्रभागातील विकास कामांमुळे चर्चेत राहिले आहे. सुसज्ज व्यायाम शाळा, पक्की स्मशानभूमी, संरक्षण भिंत, अंतर्गत सिमेंट रस्ते अशी अनेक विकास कामे या वाडीमध्ये पूर्ण झाली आहेत. त्यामुळे येथील आदिवासी समुदायचे जीवनमान उंचावले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोठ्याप्रमाणात निधी मंजूर असलेला सिमेंट काँक्रिट रस्ता व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर ऐनवेळी या कार्यक्रमाला भाजपातून बंडखोरी केलेले नगराध्यक्ष संतोष (बाबू) चौधरी यांनी हजेरी लावल्याने शहरातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


मुरबाड नगरपंचायतीमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ घडून आली होती. भाजपच्या नऊ नगरसेवकांनी बंडखोरी करून तडका फडकी पक्षाचा राजीनामा देऊन आ. कथोरेंच्या विरोधात जाऊन मुरबाड परिवर्तन पॅनल नामक स्वतंत्र गट स्थापन केला. या गटाला ठाणे जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले होते. आ. कथोरे केवळ ठराविक प्रभागातच कोट्यवधींचा निधी देतात तसेच पक्षातील नगरसेवकांवर अविश्वास, विकास कामांमध्ये अविचार, अपमानास्पद वागणूक, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पक्षबाहेरील उमेदवार लादणे असे अनेक गंभीर आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेतून आ. किसान कथोरे यांच्यावर केले होते. तर कालांतराने या पॅनलने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देखील केल्याचे समोर आले.
 


परंतु नुकताच झालेल्या आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर नगराध्यक्ष चौधरी यांनी बदलापूर येथील आमदार निवासस्थानी सहपत्नीक भेट दिली होती व हा फोटो सोशियल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे चौधरी यांची घर वापसीकडे वाटचाल झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. तर आजच्या उदघाटन सोहळ्यामध्ये चौधरी यांच्या उपस्थितीने नेटकऱ्यांच्या अनुमानाला दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र मी अजून भाजपा पक्षाचा राजीनामा दिला नसल्याचे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी उदघाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर बंडखोरीच्या अवघ्या काही दिवसांतच मडकेपाडा येथील पंचायत समितीच्या जागेत चौधरी यांनी अतिक्रमण केल्याच्या भाजपा पदाधिकारी यांच्या तक्रारीनंतर शासकीय हातोडा आला होता. मात्र याचा धसका घेऊन नगराध्यक्ष यांनी ही पीछेमूड केल्याची अंतर्गत चर्चा रंगली आहे.


तर या अजब संभ्रमित शहरी राजकारणामुळे आता fatherहे समजणे शहरवासीयांसाठी अवघड झाले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष व परिवर्तन पॅनलचे प्रमुख नगरसेवक राम दुधाळे यांच्याशी चर्चा केली असता नगराध्यक्ष चौधरी हे अधिकृत मुरबाड परिवर्तन पॅनलचे सदस्य असून त्यांची ठाणे जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या मूळ दस्तऐवजावर स्वाक्षरी असल्याचे म्हंटले. मात्र असे असतांना त्यांनी भाजपा वापसी केल्यास त्यांचा पद रद्द होईल, असा अप्रत्यक्ष गर्भित इशारा त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहेत. त्यामुळे शहरातील राजकारणाला पुढे नेमकं काय वळण लागते? याकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे.
“आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड शहरातील माझ्या प्रभागातील लांबाचीवाडी ही माझी आदिवासी वस्ती महाराष्ट्रात सर्वात सुंदर तसेच मॉडेल वस्ती म्हणुन नावारूपास आणणार हा संकल्प केला आहे.”  

-मानसी मनोज देसले, स्थानिक भाजपा नगरसेविका


-Kishor K. Gaikwad, Murbad

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...

Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments