वाचा : मुरबाड विधानसभेतील मतदान केंद्रानुसार कथोरे - पवार यांना पडलेली मते... किसन कथोरे पाचव्यांदा आमदार; चार उमेदवारांची कथोरेंविरोधात तक्रार -Kishor K. Gaikwad, Murbad

Murbad Vidhansabha Result

वाचा : मुरबाड विधानसभेतील मतदान केंद्रानुसार कथोरे - पवार यांना पडलेली मते... 

किसन कथोरे पाचव्यांदा आमदार; चार उमेदवारांची कथोरेंविरोधात तक्रार

-Kishor K. Gaikwad, Murbad

मुरबाड विधानसभा : (किशोर गायकवाडमुरबाड विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांना पराजित करून भाजपाचे किसन कथोरे यांचा मुरबाडमधून चौथ्यांदा विजय झाला आहे.

  मुरबाड विधासभेत एकूण ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. यात राष्ट्रवादीचे सुभाष पवार यांना १ लाख २१ हजार मते तर किसन कथोरे यांना १ लाख ७४ हजार मते मिळाली. सुमारे ५२ हजार अधिक मते घेऊन किसन कथोरे यांच्या गळ्यात पाचव्यांदा विधासभेच्या विजयाची माळ पडली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्रावर जल्लोष साजरा केला. तर मुरबाड शहरात हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्रित रॅली काढून आनंद साजरा केला.

Kisan kathore Win
Kisan kathore Win

मुरबाड विधानसभेतील मतदान केंद्रानुसार कथोरे - पवार यांना पडलेली मते - Click Here


कथोरेंवर अन्य चार उमेदवारांची कारवाईची मागणी...

 मुरबाड विधानसभेचा अंतीम निकाल घोषित करण्यापूर्वी भाजपचे उमेदवार किसन कथोरे आपल्या कार्यकर्त्यांसह मतमोजणी कक्षात प्रवेश करून निवडणूक अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोटो काढले त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची लेखी तक्रार बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवार प्राजक्ता येलवे, मनसेच्या संगिता चेंदवणकर, सागर अहिरे, एस. एल. पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

 किसन कथोरे यांनी संविधान विरोधी कृत्य केल्याचा आरोप करून त्यांचा निषेध करीत कथोरेंची उमेदवारी रद्द करण्याची मागणी या चार तक्रारदारांनी केली आहे. तसेच अधिकारी वर्ग व सुरक्षा यंत्रणा हे मतमोजणी कक्षात उमेदवार किसन कथोरे यांच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यास अपयशी ठरल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करवाई  न केल्यास संपूर्ण यंत्रणे विरुद्ध कायदेशीर लढा लढू असे तक्रारदार उमेदवारांनी सागितले.

-किशोर गायकवाड

(सूचना : बातमी अथवा बातमीतील ओळी, सरळ मजकूर जसेच्या तसे कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, याची नोंद कॉपी-पेस्ट धारकांनी घ्यावी.)

-किशोर गायकवाड, मुरबाड

वाचा...



Join our Whats App Group

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती)

#Kishor-Gaikwad-Murbad

0 Comments