#गट-तट: आरोपांच्या गराड्यात ठाकरे सेनेचा जन आक्रोश; पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला घरचा आहेर? आ. रुपेश म्हात्रेंच्या मुरबाड शहरात सरकार विरोधी घोषणा...
-Kishor Gaikwad
मात्र मोर्चामध्ये नियोजन पूर्वीपासून गैरउपस्थित दिसून आलेले मुरबाड तालुका प्रमुख संतोष विशे व उपजिल्हा प्रमुख मधुकर (अप्पा) घुडे यांच्या अनुपस्थितीने मुरबाडच्या ठाकरे सेनेत पक्षांतर्गत गटबाजीच्या आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे.
महिलांच्या व मुलींच्या बाबतीतल्या प्रश्नांसह मुरबाड तालुक्यातील कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, फॉरेस्ट, विद्युत वितरण कंपनी, ओद्योगिक महामंडळ, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, नगरपंचायत इ. कार्यालयांच्या संदर्भातील विविध जनहितार्थ मुद्द्यांवर मुरबाडच्या उ. बा. ठा. सेनेकडून शुक्रवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार रुपेश म्हात्रे यांनी मुरबाड बाजारपेठेत सरकार विरोधात घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांसमवेत तहसील कार्यालयावर धडक दिली. याठिकाणी भाषणे व निदर्शने करून तालुका प्रशासन व सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. तर तहसिलदार अभिजित देशमुख (Tahsildar Abhijit Deshmukh) यांनी मोर्चाला भेट देऊन लवकरच तारखा निश्चित करून तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार मिटिंग आयोजित करू व पीडित नागरिक आणि संबंधित प्रशासन यांच्यात संवाद घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन मोर्चाच्या मंचावरून दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र आश्वासन पाळले नाहीतर शिवसेना स्टाईलने प्रतिकात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला आहे
गटबाजीचा आरोप...
परंतु, मोर्चामध्ये पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा ठपका ठेऊन वरिष्ठांना मोर्चाची कल्पना दिली नसल्याचा आरोप पक्षांतून केला जात आहे. पक्षीय प्रोटोकॉलला महत्त्व न दिल्याने हा नियोजित मोर्चा वैयक्तिक असल्याचा शीर्षक पक्षांतूनच दिल्याने मुरबाडच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याची टीकाटिप्पणी होत आहे. तर पक्षांतर्गत दुफळीचा फटका तालुक्यातील पक्षीय संघटनावर होऊन नये, या चिंतेत निष्ठवंत कार्यकर्ते दिसत आहेत. त्यामुळे अंतर्गत नाराजीचे नेमकं मूळ शोधून वरिष्ठ स्तरावरून लवकरच यावर भक्कम तोडगा काढला जाईल, अशी आशा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
-किशोर गायकवाड, मुरबाड
0 Comments