मुरबाडमध्ये चाललंय काय? अल्पवयीनवर सातत्याने बलात्कार, तक्रार दाखल होताच आरोपीने संपविले जीवन?
[KISHOR GAIKWAD]
मुरबाड : (किशोर गायकवाड) अवघ्या सुसंकृत महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अल्पवयीनवर अत्याचाराची घटना मुरबाड तालुक्यात घडली असून याबाबत मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये (Murbad Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असता आरोपीने आत्महत्या केल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहिती वरून, मुरबाड तालुक्यातील (Murbad Taluka) कान्हार्ले गावतील प्रौढ व्यक्ती त्याच गावातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे नग्न फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन सातत्याने शारीरिक शोषण करीत होता. अखेर असह्य त्रासाने भयभीत पिडीतेने धाडसाने सदर प्रकार घरात सांगितला. याबाबत पीडित, तिची आई व भाऊ याने मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी हेलपाटे मारले. मात्र पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्याचे समजताच आरोपी व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला व त्यामुळे पीडितेला आपसूकच न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
याप्रकरणी दि. ९ फेब्रुवारी रोजी पीडित कुटुंब प्रथमतः तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकारी यांनी पीडितांच्या कुटुंबियांना सुमारे ४ वाजेपर्यंत तेथेच बसवून ठेवले व त्यांची दखल न घेताच त्यांना घरी पाठवले. त्यामुळे याप्रकरणी योग्य वेळी घटनेची फिर्याद नोंदवून न घेणाऱ्या पोलिस अधिकारी यांचेवर रितसर कारवाई करून नराधमावर गुन्हा नोंदविण्यात यावा, असे निवेदन रिपाइं सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने यांनी (दि. १५) मुरबाड पोलिस स्टेशनला दिले होते. तदनुसार तक्रार दाखल होऊन पुढील तपास मुरबाड पोलिस करीत आहेत.
-किशोर गायकवाड
1 Comments
अन्याय आत्याराचा विरोधात शब्दमशाल नेहमीच अग्रेसर, संपादक टीम यांना शुभेच्छा🌹🙏
ReplyDelete