#Budget Collapsed | गौरी-गणेशोत्सवावर महागाईचे संकट..!

Murbad Market in Ganpani Festival


#Budget Collapsed | गौरी - गणेशोत्सवावर महागाईचे संकट..!

[ KISHOR GAIKWAD MURBAD ]

ठाणे/मुरबाड : देशातील सर्वात मोठ्या सणांमध्ये गणला जाणाऱ्या गणेशोत्सवामुळे (Ganpati Festival) सर्वच बाजारपेठा गजबजलेल्या असून यंदाची गणेशोत्सवाची खरेदी ही महागली आहे.


  महागाईने उच्चांक गाठला असतांना अशात सणोस्तव कसे साजरे करायचे? हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव (Ganpani Festival) हा भारतातील आवडता आणि पवित्र मानला जाणारा सण आहे. या सणाला गणेशभक्त मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपल्या आवडत्या गणेश मुर्त्या खरेदी करून घरी आणतात व  मोठ्या श्रद्धेने, वाजत गाजत त्यांचे मनोभावे पूजन करतात. गणेशाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. मात्र महागाईने यंदा सर्व सामान्य जनतेचे पुरते कंबरडे मोडलेले पाहायला मिळत आहे. 

Fruits Sellers


  कोरोनाच्या दीर्घ कालावधी नंतर नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत असतांना गणपती सणातील जवळपास सर्वच खरेदी वस्तू महागल्याने गणेश भक्तांची हिरमोड झालेली पाहायला मिळत आहे. गणेश मुर्त्या तसेच हार, फुले, फळे, धूप, अगरबत्ती, पूजनाचे साहित्य, डेकोरेशनचे साहित्य, जवळपास सर्वच वस्तूंच्या दारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याने यंदाचा बजेट दुपटीने वाढला असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांच्या खिशाला मोठी कात्री बसणार असून नियोजित बजेट कोलमडणार, असा अंदाजव्यक्त केला जात आहे.




(किशोर गायकवाड|मुरबाड)

वाचा...

【 #Budget Collapsed | गौरी-गणेशोत्सवावर महागाईचे संकट..! 】

【 #Budget Collapsed | गौरी-गणेशोत्सवावर महागाईचे संकट..! 

【  Good News : 'तो' बेपत्ता मुलगा ४ महिने १८ दिवसां नंतर परतला घरी..!  】



असेच नवनवीन उपडेट्ससाठी खालील बटनावर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा

 



एकवेळ पुन्हा भेट द्या..!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आज आपल्या पसंदीची दुचाकी बुक करून घरी आणा!

(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही, सूचना, संपूर्ण किंवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे)

0 Comments