![]() |
| Missing Boy Kartik |
Good News : 'तो' बेपत्ता मुलगा ४ महिने १८ दिवसां नंतर परतला घरी..!
![]() |
| Missng boy Poster |
शहरातील गणेशनगर (ganeshnagar) येथील कार्तिक सिंग हा १२ वर्षीय मुलगा दि. ४ एप्रिल रोजी मुरबाड शहरातून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू असतांना तब्बल चार महिने १८ दिवसांनी तो सुखरूप घरी परतल्याने त्याच्या आईवडीलांच्या शोध संघर्षाला पूर्ण विराम लागला आहे.
![]() |
| Missing Boy Kartik With his Mother |
कार्तिक चार महिन्यांपूर्वी अचानक गायब झाला होता. याबाबत पोलिसांत मिसिंग केस (missng case) दाखल करण्यात येऊन सर्वत्र युद्धपातळीवर शोध कार्य सुरू असतांना दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी तो अचानक घरी परतला. कार्तिक चार महिने कुठे होता? काय करत होता? याबाबत त्याला विचारणा केली असता पूर्णपणे आठवत नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत त्याच्या मातापित्यांना विचारले असता, तो कल्याण परिसरात होता व मिळेल ते मागून खात होता. तसेच तो त्याठिकाणी पायी पोहचला व त्याला मिळेल त्याची मदत घेऊन तो घरी पोहचला असल्याचे सांगितले. मात्र तो सुखरूप घरी परतल्याने त्याच्या आईवडीलांना आनंदाश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
याबाबत शब्द मशालने (shabd mashal) वृत्त प्रसारित करून व पाठपुरावा करून सदर प्रकरण जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले होते. आपला मुलगा सुखरूप घरी परतल्याने कार्तिकच्या आईवडीलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद पाहायला मिळत असून त्यांनी शब्द मशालचे आभार मानले आहेत. तर अशी घटना पुन्हा घडू नये, मुरबाड पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत.








0 Comments