मुरबाडमधील कोविडग्रस्त रुग्णांना मिळणार मोफत जेवण आण्णा साळवे यांचा मदतीचा हात[KISHOR GAIKWAD]

मुरबाडमधील कोविडग्रस्त रुग्णांना मिळणार मोफत जेवण    
आण्णा साळवे यांचा मदतीचा हात

[KISHOR GAIKWAD]          
मुरबाड : (दि. २) कोरोना संकटकाळात राज्भर कोविड रुग्णांना अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपआपल्या परिने ही मदत देत आहे. मुरबाड तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत सध्या लॉककडाऊनमुळे हाॕटेल मधले जेवणही मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची जेवणा अभावी हेलसांड होत असल्याचे लक्षात घेऊन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आण्णा साळवे यांनी अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा संकल्प केला आहे. 
  १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरबाड येथील शासकीय कोविड सेंटर व ग्रामिण रुग्णालया मधिल पेशंट व कर्मचारी यांना जेवण देण्यात सुरू करण्यात आले आहे. मुरबाड विधासभेचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाने रुग्णांना अन्न दानाचे काम मी करणार असून मुरबाड मधिल शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातील  कोणाचीही जेवणाची अडचण असल्यास निसंकोचपणे  9270606090 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आण्णा साळवे यांनी केले आहे. तसेच हे पुण्यदाणाचे काम करण्यासाठी आण्णा साळवे यांच्या पत्नी सौ. छाया साळवे यांनीही निस्वार्थ पणे मी रुग्णांना जेवण बनविणार असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे, तालुका सचिव दिलीप पवार , पत्रकार लक्ष्मण पवार, मुरबाड ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय वाटोरे, डॉ. स्वप्नील वाघचौडे, कर्मचारी तानाजी भोईर, भाऊ हरड आदी उपस्थितीत होते.

-किशोर गायकवाड
____________________________________________



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments