![]() |
| Chatrapati Shivaji Maharaj Smarak, Murbad |
#लढ्याला यश : शिवजन्मोत्सवा पूर्वी महाराजांच्या दर्शनाचा मार्ग होणार मोकळा!
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड (दि. ११) : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अगदी समोरील लोखंडी शिडी नगर पंचायत येत्या शिवजन्मोत्सवा आधीच काढणार असल्याचे पत्र जाहीर झाल्याने शिवरायांच्या तमाम अनुयायांना आता अखंड मूर्तीचा दर्शन घडणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनासाठी तब्बल ५९ दिवसांच्या प्रतीक्षेत असलेले शहरातील भव्य शिवस्मारक अखेर दि. ३ मार्च २०१९ रोजी सर्वांसाठी खुले झाले. मात्र महाराजांना हार घालण्यासाठी, पुतळ्याची निगा राखण्यासाठी पुतळ्याच्या अगदी शेजारी अगदी शेजारी नेमकी दर्शनी भागात एक लोखंडी शिडी बसविण्यात आली आहे. परिणामी महाराजांच्या पुतळ्याचे संपूर्ण दर्शन होण्यास अडथळा ठरत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड शहर अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी दि. २८ जानेवारी रोजी 'शिवजयंती पूर्वी महाराजांच्या दर्शनासाठी अडथळा ठरत असलेल्या सदर शिडीची जागा बदलण्यात यावी' अशा आशयाचे पत्र मुरबाड नगर पंचायतला सादर केले. मात्र नगर पंचायत याबाबत गंभीर नसल्याचे लक्ष्यात आल्यावर वाघचौडे यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन मागील पत्राबाबत लेखी उत्तराची मागणी केली. तद्नंतर नगर पंचायतने दुसऱ्या दिवशी निव्वळ एक ओळीचे पत्र देऊन दुर्लक्ष केल्याने वाघचौडे यांनी दि. १५ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा देताच नगर पंचायत प्रशासन खडबडून जागे झाले व महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारील शिडीची जागा येत्या शुक्रवार दि. १९ फेब्रुवारीच्या आधी बदलण्यात येईल, असा लेखी उत्तर देऊन उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. त्यामुळे लवकरच या अडथळा ठरत असलेल्या शिडीची जागा बदलली जाऊन महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे संपूर्ण दर्शन घडणार असून या शिवकार्यासाठी वाघचौडे आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक केले जात आहे.
( किशोर गायकवाड )
___________________________________________




0 Comments