बरखास्त नगर पंचायतच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्घाटन सोहळा संपन्न

 बरखास्त नगर पंचायतच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

मुरबाड : (दि. २८) कोरोनाच्या वाढत्या संकटामध्ये मुरबाड शहरात काल साजरे करण्यात आलेल्या विविध उद्घाटन सोहळ्यांना वादग्रस्त वळण लागले असून सोशियल मीडियावर याबाबत टीकास्त्र सुरू आहे. 

  आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते काल मुरबाड शहरातील प्रभाग क्रमांक १५ व १७ मधील काँक्रीट रस्ते, प्रभाग क्रमांक १५ मधील भूमिगत विद्युत केबल, एक जनरेटर व घनकचरा व्यवस्थापन तसेच बागेश्वरी ऑक्सिजन पार्कचे आदींचे उद्घाटन करण्यात आले.  मात्र यावेळी सोशियल डिस्टनसिंग व मास्कचा विसर पडलेल्या अतिउत्साही, हौशी नौशी कार्यकर्त्यांनी फोटोग्राफी, सेल्फीच्या मोहात कोरोनाच्या सर्व नियमांना पायदळी तुडवितांना पाहायला मिळाल्याने राजकीय विरोधकांंनी चर्चेला जोर दिला आहे.

  या भूमिपूजन सोहळ्यासाठी लावण्यात आलेल्या फलकांवर आक्षेप असल्याची चर्चा सोशियल मीडियावर पाहायला मिळत असून मुरबाड नगर पंचायतच्या प्रथम पंचवार्षिकचा कालावधी संपला असतांना ही नगरसेवक/सेविका पदस्थ अशी नावे उद्घाटन फलकावर असल्याने हा वाद उफाळला होता. तसेच या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका भारतीय जनता पार्टी, मुरबाड शहर व नगर पंचायत, मुरबाड अशा दोन्ही स्वरूपात सोशियल मीडियावर पाहायला मिळाल्याने नेमका कार्यक्रम राजकीय की शासकीय? असा संभ्रम उपस्थित झाला आहे.


  मात्र कोरोना संकट काळातही अगदी किरकोळ बाबींचा ही बाऊ करून गाजावाजा करीत गर्दीचे उद्घाटन सोहळे करण्यात प्रसिद्ध असलेल्या मुरबाड भाजपा नेते, कार्यकर्त्यां यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

जनरेटरचे उद्घाटन


 #GoodNews : बागेश्वरी ऑक्सिजन पार्क सर्वांसाठी खुले

(किशोर गायकवाड)
___________________________________________



(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments