#GoodNews : बागेश्वरी ऑक्सिजन पार्क सर्वांसाठी खुले
GoodNews: Bageshwari Oxygen Park open to all
![]() |
| Bageshwari Oxygen Park Entrance |
[Murbad | KISHOR K GAIKWAD]
मुरबाड (दि. २८) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुरबाड शहर वासीयांच्या भव्य उद्यानाच्या मागणीला पूर्णविराम लागला असून शहरातील नागरिकांना आता निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येणार आहे.
![]() |
| Inauguration slate of Bageshwari Park Murbad with Shri. Kapil Patil & Shri. Kisan Kathore |
![]() |
| Walking area in Bageshwari Park Murbad |
मुरबाड वन विभागाच्या बागेश्वरी येथील सुमारे ५ हेक्टर जागेत नियोजन करून लहानमुलांसाठी मिनी गार्डन, पाळणे, घसरगुंडी, झुले, कार्टून्स पुतळे, तसेच पायी जंगल सफर, बोटिंग, विविध प्रकारची रोपे, मनमोहक सजावट, माहिती फलक असे निसर्गरम्य वातावरण निर्मिती केलेले ऑक्सिजन पार्कचे काल खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे मुरबाडच्या नागरिकांना नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता नसून लहानमुलांच्या करमणुकीचा प्रश्न ही मार्गी लागला आहे.
सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजे दरम्यान हा पार्क सर्वांसाठी खुला राहणार असून १२ वर्षांखालील व्यक्तींना वगळता पार्कचे प्रवेश शुल्क ५ रुपये राहील. तसेच सवलतीच्या दरात मासिक पासची सुविधा ही उपलब्ध केली आहे. पॅडल बोट प्रति व्यक्ती ५० रुपये तर मोटर बोट प्रति व्यक्ती ३० रुपये प्रमाणे शुल्क देऊन नागरिकांना जल सफरीचा आनंद घेता येणार आहे. पार्कमध्ये झिपलाइनचे काम सुरू असून प्रति व्यक्ती ५० रुपये शुल्क आकारले जाऊन यात परतीचा प्रवास बोटीने निशुल्क असेल. मात्र पार्कच्या नियमांचे भंग केल्यास प्रति व्यक्ती २०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पार्कमधील वन विभागाच्या फलकावर नमूद आहे.
![]() |
| Kid's Play area Bageshwari Park Murbad |
![]() |
| Kid's Play area Murbad |
तर हा उद्यान मुरबाडकरांच्या सेवेसाठीच असून त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येक मुरबाडकारांनी आपली आद्य सामाजिक जबाबदारी समजली पाहिजे व पार्कच्या विकासासाठी मोलाचं सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन मुरबाड पूर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भामरे यांनी केले आहे.
![]() |
| Boating in Bageshwari Lake |
मात्र मुरबाडच्या वन विभागाला या पार्कचे संवर्धन करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून अर्थ साहाय्य होणे गरजेचे आहे. तसेच याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी ही पार्कबाबत आस्था बाळगून पार्कच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. अन्यथा राज्यातील इतर पार्क सारखी या पार्कची ही दुरावस्था होऊन मुरबाडच्या ऑक्सिजन पार्कला अल्पावधीतच नासधूसचे ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.














0 Comments