मुरबाड पोलिसांकडून वाहनचालकांना दिवाळीच्या अनोख्या शुभेच्छा
[KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड : (दि. १७) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड पोलिस स्टेशनकडून वाहनचालकांना आज अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.
मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे व अन्य पोलीस कर्मचारी यांनी आज सकाळी मुरबाडच्या तीन हात नाक्यावर राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षित वाहतूकीची खबरदारी व सूचना करणारे पुस्तपत्रक वाटून तसेच वाहतूक कायद्याचे मार्गदर्शन करून दिवाळीच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
वाहने सावकाश चालवा तथा दारू पिऊन वाहन चालवू नका, सुरक्षित अंतर ठेवून वाहने चालवा, सीटबेल्ट, हेल्मेटचा वापर करा, वळणावर वाहने सावकाश चालवा, वाहन चालवतांना कायद्याचे पालन करा व अपघात टाळा, अशा अनेक सूचना सदर वाटप करण्यात आलेल्या पुस्तपत्रकात नमूद आहेत. याप्रसंगी वाहन चालकांना डॉ. शिवपूजे,तसेच पी. आय. बोराटे यांनी वाहतुकीच्या नियमांचे मार्गदर्शन केले व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
( किशोर गायकवाड )
___________________________________________
![]() | ||
|



0 Comments