ब्रेकिंग : नायिका भारती सिंगवर एट्रोसिटी प्रिव्हेन्शन एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा!|Bharti Singh should be charged under Atrocity Prevention Act!
उपसभापती अरुणा रघुनाथ खाकर यांची मुरबाड पोलिसांत लेखी तक्रार
वाचा सविस्तर...
[ KISHOR K. GAIKWAD]
![]() |
| Bharti Singh |
मुरबाड : (दि. २९) गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मुरबाडच्या तीन हात नाक्यावर निदर्शने करण्यात आली असतांना आता बॉलिवूडची प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंग हिच्या वादग्रस्त मिमिक्री आणि वक्तृत्वा विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कलर्स टीव्ही चॅनेलवरील 'खतरा खतरा' या कार्यक्रमाला होस्ट करणारी प्रसिद्ध कॉमेडीयन नायिका भारती सिंग हिने दि. ५ एप्रिल २०२० रोजीच्या शो दरम्यान आदिवासी समाजाच्या भावना दुखवाणारी मिमिक्री आणि वक्तृत्व केले आहे. याविरोधात काल मुरबाड पंचायत समितीच्या अरुणा रघुनाथ खाकर आणि आदिवासी बांधवांनी निषेध व्यक्त करीत कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे.
'कलर्स टीव्ही चँनेलवरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करत जातिवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केली आहे. आदिवासी समाजातर्फे त्यांच्या या कृत्याला आम्ही सर्व आदिवासी समाज म्हणून जाहीर निषेध करतो. भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आदिवासी समाजाला जातिवाचक अपशब्द बोलून आदिवासी समाजाचा अपमान करणे, जातिवाचक बोलून आदिवासी समाजाच्या भावना दुखावणे, असा गैरप्रकार जाणिवपूर्वक केला आहे. तरी भारती सिंग यांचा कलर्स टीव्ही वरील शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा. तसेच भारती सिंग व कलर्स चँनेवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी,' अशी मागणी मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती अरुणा खाकर यांनी मुरबाड पोलीस स्टेशनला लेखी तक्रारी अर्ज देऊन केली आहे. यावेळी आदिवासी लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर, मुरबाड कृषी उत्पन्न बाजर समीती संचालक अनिल कवटे, सरपंच भारती शिद, सरपंच नारायण सावळा, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ उघडे, पांडू शिद आदी उपस्थितीत होते.
(किशोर गायकवाड)
______________________________________________


0 Comments