मुरबाड | कोविड रुग्णालयात डॉ. प्रमोद पष्टे यांच्यावर हल्ला | Attack on Dr. Pramod Pashte in Covid Hospital Murbad - SHABD MASHAL - Kishor Gaikwad


मुरबाड | कोविड रुग्णालयात डॉ. प्रमोद पष्टे यांच्यावर हल्ला | Attack on Dr. Pramod Pashte in Covid Hospital Murbad - SHABD MASHAL

( KISHOR K. GAIKWAD)

Attack in Covid Centre Murbad
Aniket Pashte got injured while saving his Brother - Dr Pramod Paste


मुरबाड : (दि. ११) मुरबाड शहरातील खासगी गणपती कोविड हॉस्पिटलमधील डॉ. प्रमोद पष्टे यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

Covid Centre Murbad
Covid Centre Murbad

Attack in Covid Centre Murbad
Knife used by attackers


   मुरबाड शहरातील सारिका हॉटेल शेजारी सुमारे दोन महिन्यांपूर्वी १०० बेड्सचे खासगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. आजवर २०० हुन अधिक कोरोनाग्रस्तांनी येथे उपचार घेतल्याचे बोलले जात आहे. काल रात्री याच कोविड सेंटरमध्ये सदरचा धक्कादायक प्रकार घडला आहे.



  याबाबत डॉ. प्रमोद पष्टे यांना विचारले असता, 'क्षुल्लक कारणावरून मारुती टेकडे या पेशंटचे नातेवाईक दारू पिऊन येथे आले आणि क्षुल्लक कारणावरून शिवीगाळी करायला सुरुवात केली. आमच्या सेक्युरिटी गार्डला खूप मारहाण ही केली. मी सोडवायला गेलो असता माझ्यावर ही हात टाकला. नंतर एका मोठ्या सुऱ्याने आमच्या रिसेप्शनिस्टला धमकावले. तसेच मला मारायला धावले असता माझा भाऊ वाचवायला आल्याने त्याच्या उजवा हाताला सुरा लागला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फार्मासिस्टच्या मागे चाकू घेऊन धावले. कोविड सेंटरमध्ये जाऊन कोण नर्स आहे येथे? असे म्हणून चाकू दाखवून धमकावू लागले. आमच्या सेक्युरिटी गार्डच्या पोटाला बंदूक लावली आणि माझ्या पोटाला चाकू लावला. यादरम्यान वाचवायला आलेल्या माझ्या भावाला चाकूला लागला. याबाबत मुरबाड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.' असे सांगितले. त्यामुळे याप्रकरणाला नेमके काय वळण लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(किशोर गायकवाड)

______________________________________________

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments