Market Closed in Murbad???
Market main road Murbad

FactCheck : मुरबाड शहर पाच दिवस बंद??? |Market Closed for five days in Murbad???


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १०) मागील काही दिवसांपासून  मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. यात खुद्द शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा ही समावेश आहे. त्यामुळे उद्यापासून मुरबाड शहर बंद ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Market Closed in Murbad???
Government hospital Murbad

  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुरबाड शहरात यापूर्वी अनेकदा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची नवीन मोठी आकडेवारी समोर आली की मुरबाड शहरातील नागरिकांना बाजारपेठ बंदची भीती सतावते. तर पुढील पाच दिवस मुरबाड शहर बंद ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपासून असून याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी पत्रकारांना अनेक फोन येत आहेत. 

Market Closed in Murbad???
  
  कोरोनामुळे मुरबाडमधील सामान्य नागरिकांचे पुरते कंबरडे मोडले असून पैशा अभावी दैनंदिन संसाराचा गाडा अक्षरशः हलाखीच्या परिस्थितीत चालढकल पध्दतीने लोटत असल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. सबब पुन्हा या पाच दिवस बंदीची तलवार कोसळल्यावर हातावर पोट असणाऱ्यांना कुटुंब उदरनिर्वाहासाठी धान्य, रेशन, किराणा, भाजीपाला यांचे एकदम नियोजन करणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून नुकसानीत असणाऱ्या व्यापारी वर्गात ही या चर्चेमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. 
Market Closed in Murbad???
Murbad Nagar Panchayat

  याबाबत मुरबाड नगर पंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता खरी माहिती समोर आली. यावर त्यांनी सांगितले की, 'मुरबाड शहराची बाजारपेठ बंद ही फक्त अफवा असून नागरिकांनी अफवांंवर विश्वास ठेवू नये. जनतेने स्वतःहून ठरवून स्वेच्छेने दुकाने बंद ठेवली तर नगर पंचायत प्रशासनाला हरकत नाही. मात्र नगर पंचायतकडून अधिकृत असा कोणताही मुरबाड शहरातील बाजारपेठ बंदचा आदेश नाही. फक्त उद्या शुक्रवारी नेहमीप्रमाणे बाजारपेठ बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी अशी कोणतीही अफवा पसरवू नये अथवा त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.'

(किशोर गायकवाड)

______________________________________________


(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)