खळबळजनक : धसई गावात राहत्या घराला आग...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २६) मुरबाडमधील धसई गावातील एका राहत्या घराला काल अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली असून यात मोठ्याप्रमाणात नुकसानी झाली आहे.
मुरबाड तालुक्यातील धसई गावातील सुनिता मारुती सुरोशे यांच्या राहत्या घराला काल अचानक दुपारच्या सुमारास आग लागल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूं सह इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे व अन्य वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागली असून विद्युत बल्ब बदलण्याच्या दरम्यान अनपेक्षितपणे ही घटना घडली आहे. यात फ्रीज व प्लास्टिकच्या वस्तूंचा सर्वाधिक नुकसान झाल्याचे महेश सुरोशे यांनी सांगितले.
याप्रकरणी महसूल विभागाचे धसई परिक्षेत्राचे तलाठी संतोष पवार यांनी १ लाख ५७ हजार रुपयांचा नुकसान झाल्याचा स्थळ पंचनामा मुरबाड तहसील कार्यलयात सादर केला आहे. तसेच सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सादर पंचनाम्यात नमूद आहे.
"आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पीडितांना लवकरच त्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच त्यांना धान्य देण्याबाबत रेशनिंग दुकानदाराला सूचना केल्या आहेत."
-संतोष पवार, तलाठी (तहसील कार्यलय, मुरबाड)
______________________________________________
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
![]() |
| Creative Science Hub - Murbad |


0 Comments