![]() |
| Chaundi Waterfall, Murbad |
ब्रेकिंग | मुरबाड : धबधब्यावर गेलेल्या आंबेळे गावातील तरुणांचा मृत्यू...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १३) तालुक्यातील आंबेळे (गडगे) गावातील काही तरुण आज खोपिवली गावच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेले असता यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहिती नुसार मुरबाड तालुक्यातील आंबेळे (गडगे) गावचे सहा तरुण आज दुपारच्या दरम्यान खोपिवली येथील चोंडीच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. चोंडीचा धबधबा जितका मनमोहक म्हणून प्रसिद्ध आहे, तितकाच धोकादायक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे अज्ञात व्यक्तींना जाण्यास गावकरी बंदी करीत असतात. मात्र आज पर्यटनासाठी गेलेल्या सहा तरुणांनी याबाबत गावात कल्पना न दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
पर्यटनासाठी गेलेल्या ६ तरुणांपैकी धबधब्यामध्ये अंघोळी दरम्यान दोन तरुणांना आपला जीव गमावला लागला आहे. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी स्थळी धाव घेतली. मुरबाड पोलिस, अग्निशमन दल व एन. डी. आर. एफ. ची टीम ही घटनास्थळी हजर झाली असून तपासला सुरुवात केली. उमेश पुंडलिक बोटकुंडले (वय २१) असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव असून कार्तिक गडगे (वय २२) याचा शोध सुरू आहे.
( किशोर गायकवाड ______________________________

0 Comments