मुरबाड : बहिणीच्या मृत्यू पश्चात मानलेल्या भावाने पूर्ण केली इच्छा - [ KISHOR K. GAIKWAD ]

मुरबाड : बहिणीच्या मृत्यू पश्चात मानलेल्या भावाने पूर्ण केली इच्छा


[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. १२) 'सख्खा भाऊ पक्का वैरी' ही म्हण हल्लीच्या युगात सर्वदूर प्रचलित असतांना एका मानलेल्या भाऊ बहिणीच्या नात्याच्या मायेचे बंध आज मुरबाडमध्ये पाहायला मिळाले आहे.

   मुरबाड तालुक्यातील साखरे - धारगाव येथील जेष्ठ सुईनबाई जेठाई धावू पवार यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जेठाबाई यांनी वयाचे सुमारे पन्नास वर्षे मुरबाड तालुक्यात मोफत प्रसूती सेवा दिली. आजवर हजारो प्रसूती तिने कोणत्याही मोबदल्या खेरीज मोफत केल्या. त्यामुळे आज पंचक्रोशीतून तिला श्रद्धांजली वाहिली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.


  मात्र मृत्यू समयी तिने आपला मानलेला भाऊ साईगोपाळ पवार यांस तिच्या मृत्यूनंतर प्रेताला खांदा, प्रेताग्नी व अंत्यविधीची जबाबदारी दिली होती. त्यानुसार साईगोपाळ यांनी आपल्या बहिणीची अंतिम जबाबदारी पार पाडत दहनविधी व दशक्रिया विधी करून बहिणीने दिलेल्या जबाबदारीचे ओझे उतरवले असल्याचे सांगितले. तसेच आमची आई जरी आज सोबत नसली तरी एक भक्कम आधार म्हणून दिलेला मामा, हे नातं आम्ही कायम टिकवून ठेवू असा विश्वास जेठाबाईचा मुलगा भगवान याने आज दशक्रिया विधी दरम्यान व्यक्त केला.
   
  आज सर्वत्र घराघरात कौटुंबिक वैमनस्य दिसत असतांना त्याच पार्श्वभूमीवर रक्ता पेक्षाही मानलेल्या नात्याचे मोल काय असते? हे या निमित्ताने स्पष्ट झाले. 

( किशोर गायकवाड )
______________________________



Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments