ठाणे | मुरबाड : व्यायामशाळेंना हिरवा कंदील कधी? - [ किशोर गायकवाड ]

Gym

मुरबाड : व्यायामशाळेंना हिरवा कंदील कधी? 

जिम प्रेमींची हिरमोड तर जिम चालकांवर उपासमारीची वेळ...

वाचा सविस्तर माहिती...

[ किशोर गायकवाड ] 

मुरबाड : (दि. ) लॉकडाउनने अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आणली असतांना यात सर्वाधिक फटका व्यायाम शाळा मालकांना बसला आहे. 

   लॉकडाउन प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशभरातील व्यायाम शाळांवर बंदी घातली आहे. मात्र दि. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या अनलॉक ३ मध्ये व्यायाम शाळांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आहे. परंतु राज्य शासनाने याबाबत अद्याप काही परिपत्रक जारी न केल्याने मुरबाड तालुक्यातील व्यायाम शाळा अद्यापही बंद अवस्थेत दिसून येतात आहेत.  
   
   कोरोना सारख्या महामारीवर शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती हेच सद्यातरी एकमेव उपाय आहे. परंतु शरीराचा व्यायामच होत नसल्याने अनेक व्याधींना सामोरे जाण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ काही उपाययोजना आखून जिम प्रेमींना दिलासा द्यावा, अशी मागणी सद्या मुरबाडमधून होत आहे.
   
   याबाबत जिम मालकांशी संपर्क साधला असता, लॉकडाउन सुरू झाल्यापासून आमच्या व्यायाम शाळा बंद आहेत. त्यामुळे कुटुंब उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उद्भवला आहे. शिवाय जिममध्ये कामाला असणारे जिम ट्रेनर यांचा रोजगार तसेच वीज बिल, व्यायामशाळेचा भाडा, मेंटेनन्स अशा सर्वच बाबी थकीत आहेत व आता नव्याने सेटअप सुरू करण्याचा खर्च ही येऊन ठेपला आहे. त्यामुळे सरकारने आमच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचारविनिमय करून आम्हाला आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली आहे.
   
"केंद्र सरकारने जिम वरील बंधने हटवली असून राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सुचना प्राप्तीनंतर व्यायामशाळांना सुरक्षिततेची नियमावली लावून रितसर सुरू केल्या जातील"
        -अमोल कदम, तहसीलदार मुरबाड 

"केंद्र सरकारने व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु राज्य शासनाची परवानगी अजून आली नसल्याने मुरबाडच्या व्यायाम शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे आदेश आल्यास नियमांचे पालन करून मुरबाड शहरातील व्यायाम शाळा सुरू करण्यास हरकत नाही."
        -परितोष कंकाळ, मुख्याधिकारी नगर पंचायत, मुरबाड
_____________________________________________




Murbad

    [टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]

(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments