मुरबाड : शहरातील दुकानांचे वेळापत्रक बदलले...
वाचा : नवीन नियमावली नुसार 'ही' दुकाने राहितील चालू...
[ PM-Kisan : घरबसल्या चेक करा, PM-Kisan चे पैसे बँक खात्यात जमा झाले का नाही?]
( किशोर गायकवाड )
मुरबाड : (दि. ५) आठवड्यातील शुक्रवार वगळून मुरबाड शहरातील सर्व दुकाने सम-विषम तारखेच्या पध्दतीने सुरू असतांना पुन्हा लॉकडाउन वाढविल्यामुळे नवीन नियमावली नुसार आता दुकाने खुली राहणार आहेत.
कंटेन्मेंट झोन असलेल्या क्षेत्रात लॉकडाउन वाढविण्याबाबत ठाणे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ३१ जुलै रोजी आदेश जारी केला होता. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधील अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा तसेच शासकीय कामकाज वगळता मुरबाड शहरात पुढील दिनांक ३१ ऑगस्ट पर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे.
नवीन नियमावली नुसार कंटेन्मेंट झोन वगळून मुरबाड शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ इ. दुकानांतून फक्त पार्सल सर्व्हीस सुरू ठेवण्याचे आदेशात नमूद आहे.
तर सुरू राहणाऱ्या दुकानांमधील दुकानदारांनी मास्क, सानिटायजर वापरणे बंधनकारक असून ग्राहकांना ही सॅनिटायजर उपलब्ध ठेवणे अनिवार्य राहील. तसेच दुकानासमोरील गर्दी टाळणे, ग्राहकांमध्ये सोशियल डिस्टनसिंग राहील याबाबतची खबरदारी बाळगणे ही आवश्यक आहे. मात्र याबाबत काही कुचराई झाल्यास कायदेशीर कारवाईसामोरे जावे लागणार असल्याचे नगर पंचायतने प्रसिद्ध केलेल्या आजच्या पत्रात म्हंटले आहे.



0 Comments