माझ्या मुरबाडचा माळशेज! | किशोर गायकवाड

Malshej Ghat Murbad
Beauty of Malshej Ghat


माझ्या मुरबाडचा माळशेज!


मावणार नाही डोळ्यांत तुझ्या,
त्याच्या सौंदर्याचं तेजं;
सर्वदूर आहे ख्याती असा,
माझ्या मुरबाडचा माळशेजं!

हाच आमचा कोंडाणा,
हाच आमचा रायरी;
शिवबाच्या पदस्पर्शाने;
पावन झालेली पायरी!

आकाशाला भेदणारे,
अभिमान आमचा सांगती;
शिखर त्याचे रुबाबदार,
जणू मदत आता मागती!

दृष्ट तुला लागली कोणाची?
खोट्या विकासात फसलास तू;
सुशोभीकरणाचं निमित्त आहे,
कसा त्या मोहाला भूललास तू?

पैसा तुझ्या संवर्धनाचा,
अन् विकसित होतोय भुरटा;
तू राहतो अर्धवटच,
बघ, लोणी खातोय चोरटा!

हव्यासखोर माफियांची,
लुटणारी टोळीच ती;
ओतून ही न भरणारी,
फाटलेली झोळीच ती!

क्रूरतेने पोखरणाऱ्यांनो,
हे कुरण नव्हे चरण्याचे;
लाचखाऊ खिशे तुमचे,
हे साधन नव्हे भरण्याचे!

होय, जागेल माझा मुरबाडकर,
तेव्हा हिशोब तुमचा सुटणार नाही;
लचके तोडून माळशेजला माझ्या,
पुन्हा कोणी लुटणार नाही..!
पुन्हा कोणी लुटणार नाही..!
        -किशोर गायकवाड

Malshej Ghat Murbad
Malshej Ghat Valley


Malshej Ghat Murbad-Nagar
Landscape view of Malshej Ghat


0 Comments