ब्रेकिंग : घोडदेश्वर येथे कारचा अपघात...
[ किशोर गायकवाड ]
मुरबाड : (दि. २) मुरबाड एम. आय. डी. सी. जवळील वन विभागाच्या कुडवली नर्सरी नजीक असणाऱ्या घोडदेश्वर येथे नुकताच एका ब्रेझा कारचा अपघात झाल्याची घटना घडली असून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एम. एच. ०५ डी. एस. ६६३९ क्रमांकाची ब्रेझा कार मोहरई दिशेवरून मुरबाडकडे येत असतांना घोडदेश्वर येथे नियंत्रण सुटल्याने पलटली असल्याचे समजले आहे. यातील ४ जखमींना मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आणखीन १ जखमीचा शोध सुरू असतांना तो उशिरा भेटल्याचे सांगितले जात आहे. यात गाडीची मोठ्याप्रमाणात नुकसानी झाली असून जखमीं पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयाकडे पाठविल्याचे बोलले जात आहे. सदर जखमी मडकेपाडा येथील राहणार असल्याचे समजते.
_____________________________________________
[ साहित्याचं रत्न..! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
[ देवगाव ग्रामपंचायतमध्ये राखीव निधीतून दिव्यांगांना धान्य किट वाटप... बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा ]
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)

0 Comments