रत्न साहित्याचं..! -[ किशोर गायकवाड ]

अवघ्या दीड दिवसाच्या शिक्षणाने साहित्यरत्न झाला, अभ्यासक्रम पूर्ण झाले असते तर..?

   साहित्याची प्रेरणाज्योत, लेखन सम्राट, ज्ञानेश, विश्वविद्यापीठ, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...

  #रत्न साहित्याचं..!

एल्गार तो विद्रोहाचा;
होता लेखणीत माहिर,
साहित्यरत्न माझा भाऊराया;
असा समतेचा लोकशाहीर..!

उपेक्षेचं जीवन पदरी,
अन् दीड दिवसाचं शिक्षणं;
घडलाय असा कोण जादूगार?
विचार पडतोय क्षणोक्षणं!

साहित्याच्या रोषणाईने,
अंधकार तो दूर पळाला;
लेखणीचा घाव घालुनी,
जगी, ज्ञानाचा भिम कळाला!
जगी, ज्ञानाचा भिम कळाला!
             -किशोर गायकवाड

0 Comments