मुरबाड कोरोना ब्रेकिंग : सलग दुसऱ्या दिवशी मृतांच्या आकडेवारीत वाढ
चिंताजनक : ३ वर्षीय चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह
[ किशोर गायकवाड ]
मुरबाड : (दि. २५) आज सलग दुसऱ्या दिवशी मुरबाडमधील कोरोना मृताची आकडेवारी वाढली आहे. मुरबाड शहरातील रहिवासी असलेल्या ६७ वर्षीय व्यक्तीचे आज निधन झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. दिनांक १५ जुलै रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर मुरबाडच्या खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या साहाय्याने उपचार सुरू असतांना काल उपचारा दरम्यान मृत पावले. त्यामुळे मुरबाडची मृत आकडेवारी आज पुन्हा वाढली आहे. त्यामुळे मुरबाडची मृत आकडेवारी आज पुन्हा वाढली आहे. सदर व्यक्तीचा शव बदलापूर येथे नेऊन तेथे दहनविधी करण्यात आल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी सरळगाव येथील ५६ वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर मुरबाडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज त्या महिलेची २५ वर्षीय सून व ३ वर्षीय चिमुकलीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सद्या या दोन्ही माय-लेकी घरी असून उद्या उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात अहवाल
• मुरबाड शहर :-
1) पोलिस वसाहत - ३९, ३५ व ३० वर्षीय (सर्व) पुरुष
2) सोनार आळी - ६२ वर्षीय पुरुष
3) कुंभार आळी - ४५ वर्षीय महिला
• देवगाव (वैतागवाडी) - १३ वर्षीय मुलगी
• पवाळे - २६ वर्षीय तरुण ( वाहन चालक असल्याचे समजते)
• सरळगाव - २५ वर्षीय महिला व ३ वर्षीय चिमुकला
आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या = २५५ (बरे झालेले व मृत रुग्ण धरून)
आजपर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण = १८०
आजपर्यंत टेस्टिंगसाठी नेलेले एकूण स्वॅब = १०६३
मृत्यू:- ०८ (मुरबाड)
_____________________________________________
_____________________________________________
मेगा भरती
मुरबाड मधील नामांकीत कंपनीसाठी मुले -मुली कामासाठी हवे आहेत .
- शिक्षण - 10 वी उत्तीर्ण
- पगार - रु. 9400(आठ तास)
रु. 14146(बारा तास ) - पी. एफ. -10%
- ई. एस. आय. सी. - 3%
- बस सेवा - रु. 500 (टोकावडे, म्हसा, किंन्हवली, कल्याण येथून उपलब्ध आहेत)
- मेस उपलब्ध
संपर्क
सचिन - 7768041858
चंद्रकांत - 9225158410
रविंद्र - 9764069717/9272724111
___________________________________________________________________________________
[ आमच्या फेसबुक पेजला झटपट भेट देण्यासाठी येथे क्लिक करा ]
[टिळक स्कॉलर्स अकॅडमी व्हाट्सएप क्रमांक - ९८९५७३८६८१]
(शब्द मशालच्या सदर बातमीमध्ये अथवा कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)


0 Comments