धक्कादायक : मुरबाड तालुक्यात आज ७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर! (किशोर गायकवाड)

Murbad Corona News



मुरबाड : (दि. २६) मागील काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. त्यात एका अल्पवयीन युवकाच्या मृत्यूची नोंद तर एक वयस्क आजीबाईची कोरोनावर मात; असा दुहेरी घटना ही समोर आल्या आहेत. असे असतांना आज चक्क ७ नव्या रुग्णांची भर या आकडेवारीत पडली आहे.

   कॅन्सरवरून उपचार घेऊन घरी परतलेल्या सोनारपाडा येथील ५८ वर्षीय व्यक्तीला दोन दिवसांत त्रास जाणवू लागल्याने पुन्हा हॉस्पिटलकडे रवाना केले. यावेळी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली होती. मात्र आता याच रुग्णाच्या ५० वर्षीय पत्नीची टेस्ट ही आज (दि. २५ जून  रोजी) पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याच्या आकडेवारीत वाढ झाली असून त्याच्या मुलाची टेस्ट निगेटिव्ह आल्याची दिलासादायक बाब घडली आहे. तर त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वॅब उद्या तपासणीसाठी पाठविणार असल्याचे समजते. 
   
   *दरम्यान सदर इसमाच्या मृत्यूच्या अफवेने ही वेग धरल्याने त्यांच्या कुटुंबियांना नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या फोन कॉल्सचा मोठा त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तर सद्यस्थितीला सदर कोरोनाग्रस्त रुग्ण उपचाराला योग्य प्रतिसाद देत असून अशीच प्रगती राहिल्यास लवकरच त्यांना व्हेंटिलेटरमुक्त केले जाण्याचा मानस डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे नातेवाईकांनी शब्द मशालशी बोलतांना सांगितले. त्यामुळे कोणीही खोट्या अफवा पसरवू नये तथा त्यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.



Murbad Corona News





  काल सायंकाळी, (दि. २४ जून रोजी) मुरबाड शहराच्या अगदी जवळ असलेल्या मडकेपाडा येथील २५ वर्षीय व्यक्तीचे कोरोना रेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. सदर व्यक्ती हा जिजाऊ सामाजिक संस्था नामक ऍम्ब्युलन्सवर चालक म्हणून काम करीत असल्याचे समजते. मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्याने हॉस्पिटलला पोहचविल्या असल्याने दरम्यान त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे बोलले जात आहे. सद्या मडकेपाडा येथे २१ व्यक्तींना होम कोरोन्टाईन करण्यात आले असून गाव प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

  मात्र ज्या ६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत त्यांची सविस्तर माहिती उद्या मिळणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

    मुरबाड तालुक्यात व शहरात सद्या कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता नागरिकांनी जबाबदारीने वागले पहिजेत तथा शासकीय नियमावलीचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. *पुढील काही महिन्यांत ही आकडेवारी आद्यप जोर धरण्याची शक्यता नाकारता येत नसून नागरिकांनी आताच काळजीपूर्वक वागण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.




थोडक्यात

  • मुरबाड तालुक्यातील एकूण होम कोरोन्टाईन = ८१
  •   बरे झालेले रुग्ण = ८
  •   मृत्यू = १
पॉझिटिव्ह रुग्ण-
  •          कोंडेसाखरे- ४
  •          अस्कोत- २
  •          शिरगाव- १
  •          मुरबाड शहर- २
  •          मडकेपाडा- १
  •          मुरबाड तालुका - ६
  •          एकूण = १६

12 Comments

  1. अशीच माहिती पोचवत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच... धन्यवाद

      Delete
  2. Ashich mahiti pochavat raha saheb

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच प्रयत्न राहील... धन्यवाद

      Delete
  3. छान काम करतोय किशोर गायकवाड़

    ReplyDelete
  4. खुपछान काम करताय दादा अशीच माहिती तुम्ही पोचवात जा.

    ReplyDelete