मुरबाडमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ | किशोर गायकवाड

     Containment zone Murbad

मुरबाड
: (दि. २२) विद्युत विजेच्या प्रवाहा प्रमाणे संपूर्ण जगभर धाव घेणारा कोरोना विषाणू, मुरबाड तालुक्याचे संरक्षण कवच मोडीत अखेर मुरबाडच्या मातीत दाखल झाला. सुरुवातीला काही अफवांनी तालुका हादरला होता. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात धोका वाढला. मुरबाडच्या ७ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणून नोंद होते. शेवटच्या रुग्णाला हॉस्पिटलमधून सुटका मिळताच, पुन्हा नव्याने धोक्याची घंटा वाजली. मुरबाडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली.

[ब्रेकिंग :आज एकाच दिवसांत तालुक्यातील तीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुरबाड आरोग्य विभागाने दिली आहे]


  मुरबाड तालुक्यातील कोंडेसाखरे येथील अंदाजे सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा दि. १५ जून रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची कोरोना रुग्ण आकडेवारी नव्याने सुरू झाली. दिनांक १९ जून रोजी या आजीबाईंचा ४५ वर्षीय मुलगा व ४० वर्षीय सुने सहित १८ वर्षीय नातीचा कोरोना रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. तर सलग तिसऱ्या दिवशी, शनिवार दि. २० जून रोजी त्याच वृद्ध महिला रुग्णाच्या ९ वर्षीय चिमुकल्या नातीचे रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आल्याने तणावात वाढ झाली आहे. सद्या या सर्वांवर ठाणेच्या घोडबंदर येथील होरायझन कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.

  
कोंडेसाखरे गावातील स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यां सोबत गावात मिटिंग घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यातबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. या वृद्ध महिलेला तिच्या अन्य शारीरिक आजारांवर उपचारासाठी इतरत्र न्यावे लागत असत. याच दरम्यान तिला लागण झाल्याचे सांगितले जाते. मात्र काल रविवारी (दि. २१ रोजी) सायंकाळी या सत्तर वर्षीय आजीबाईचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तालुक्यात काही अंशी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

   एका अपघातात जखमी झालेला मुरबाड तालुक्यातील शिरगाव येथील आदिवासी कुटुंबातील ३७ वर्षीय पुरुष मुरबाड तालुक्या बाहेर उपचार घेत असतांना दि. १९ रोजी त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा आरोग्य प्रशासनाला खडबडून जागे व्हावे लागले. सद्या त्यावर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
  मुरबाड शहरातील मुस्लिम मोहल्ला येथील २२ वर्षीय युवक मुंबईमधील हिंदुजा हॉस्पिटल येथे कॅन्सर या आजारावर उपचार घेत होता. डिस्चार्ज नंतर त्याला भिवंडी येथे आप्तेष्टांकडे ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवल्याने त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले व काही तासांनी तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याचे समजते. दरम्यान कोरोना टेस्टिंगसाठी त्याचे पाठवण्यात आलेले स्वॅब पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मुळात त्याला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने व्यापले असतांना त्याच्या मृत्यूला कोरोना निमित्त ठरल्याचे बोलले जात आहे. या दुःखद घटनेने शहरात शोककळा पसरली असतांना आज सकाळी नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वार्ता येऊन ठेपली.
 
   या तिन्ही घटनेच्या साखळीशी संबंध नसलेल्या मुरबाड शहरातील गजबजलेल्या सोनारपाडा परिसरात आज ५८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची वार्ता समोर आली आणि कोरोनामुक्त मुरबाड शहरात पुन्हा थरकाप सुरू झाला.
   
   सदर रुग्णाला कॅन्सर या आजाराने ग्रासले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना शस्रक्रिया करून मुरबाड येथे आपल्या घरी आणले होते. तत्पूर्वी टिटवाळा येथून ठाणे येथील रुग्णालयात ते उपचार घेत होते. याच दरम्यान त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या कुटुंबाने शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढे बदलापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तेथे त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. त्यामुळे आज त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे स्वॅब टेस्टिंग नेले असून उद्या आणखीन ४ स्वॅब टेस्टिंगला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले


  या घटनांमुळे मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील तीन इमारती, मुस्लिम मोहल्ला तसेच कोंडेसाखरे गाव अंतर्गत रहदारीसाठी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. मात्र सद्या तालुक्यामध्ये दहशतीच्या वातावरणात वाढ होत असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे दिसत आहे.


             -:थोडक्यात:-

*मुरबाड तालुक्यातील होम कोरोन्टाईन-

मोहरई आणि शिरगाव = २१
कोंडेसाखरे = १०
देवगाव (साई संसार सोसायटी) - २
वडवली गाव = ५
वडगाव(धसई) = ३
मुरबाड शहर = ४२
एकूण = ८३

*रिपोर्ट पेंडिंग-

कोंडेसाखरे = २
अस्कोत- ७ (डोंबिवली येथील पॉझिटिव्ह व्यक्ती येऊन गेल्याने?)
शिरगाव- १०
मुरबाड- १
वडवली- २
एकूण = २२

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या - ८
बरे झालेले रुग्ण - ८
मृत्यू - १ 

8 Comments

  1. अतिशय सुंदर (अद्ययावत ) माहिती

    ReplyDelete
  2. आपण राहात असलेल्या क्षेत्रात कोरोना माहामारी किती वाढली व किती कमी झाली. हे शब्द मशाल मुळे समजतय आहे. धन्यवाद शब्द मशाल 👏 व त्या मुळे आम्ही कळजी घेत आहोत.

    ReplyDelete
  3. मुरबाड तालुक्याच्या बातम्या फक्त व्हाॅट्स अप वर समजायच्या पण किती बातम्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न अस्यचा पण आज शब्द मशाल ने अगदी अपडेट बातम्या पोहचविल्या आहेत .
    धन्यवाद शब्द मशाल ,किशोरजी

    ReplyDelete