मुरबाड | वाचा : 'या' चार महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांसाठी आज रिपाई सेक्युलरने दिला लेखी निवेदन...
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : (दि. २०) मुरबाड तालुक्यातील विविध समस्या आणि तक्रारींना शासन दरबारी मांडण्याकरिता रिपाई सेक्युलर ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज मुरबाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
परतीच्या पावसामुळे लागवडी खालील पिकांचे त्वरित पंचनामे करून वनपट्टे धारक दावेदार यांच्या सुनावणी झालेल्या शेत जमिनीवरील पिकांचे पंचनामे नुकसान भरपाई मिळावी, काळू शाही नदी लगत प्रस्तावित धरणामध्ये बाधित होणाऱ्या जमीन पट्ट्यातील जमिनीच्या खरेदीविक्रीचे प्रमाण मोठ्या संख्येने सुरू आहे. त्यामध्ये मूळ शेतकऱ्यांच्या गरिबीचा व अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन महार वतन नवीन शर्त कुळकायदा व अधिनियमांचे भंग करून शेतकऱ्यांना पूर्णपणे भूमिहीन करण्यात येत आहे, सदर प्रकरणांची तसेच जमिनींच्या खरेदीविक्री व्यवहारांची चौकशी करून सदर जागा सरकार जमा करावी, मुरबाड तालुक्यात अवैध रेती तस्करी व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित महसूलचे भरारी पथक त्यांना सहकार्य करीत आहेत. याबाबत कारवाई करावी, गाव कोतवाल व तलाठी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात रहिवास करण्याची व तलाठी कार्यालयात हजर राहण्याची समज द्यावी तथा कार्यक्षेत्रात न राहणाऱ्यावर कारवाई करावी, अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख सदर निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रसंगी रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, मुरबाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, तालुका युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष मुरबाड तालुका सचिन धनगर, विद्यार्थी संघटना अध्यक्ष निखिल अहिरे, विशाल जाधव, निकेश अहिरे, सिद्धेश धनगर, रोहित धनगर आधी उपस्थित होते. मात्र या गंभीर बाबींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असे प्रतिपादन रविंद्र चंदने यांनी शब्द मशालशी बोलतांना केले आहे.
( किशोर गायकवाड )
___________________________________________


0 Comments