धक्कादायक : बोअरवेल जुनी मात्र बिल काढलं नवीन!

ग्रामपंचायत नारिवलीत पाणीतही मनी अपहार...

भ्रष्टाचारात माखले सरपंचाचे हात?

[ KISHOR K. GAIKWAD]

Gram Panchayat Naravali
Gram Panchayat Naravali

मुरबाड : (दि. १९) मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत नारीवली येथील बौद्ध समाज वस्तीत चालू वर्षी सन २०२० मध्ये नवीन बोअरवेलचे काम केल्याचे भासवून संबंधित कामाचे बिल काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत संबंधितांवर अट्रोसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत तथा अन्य भा. द. वि. संहिते अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी नारीवली ग्रामस्थांनी मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेकडे केली आहे. 

  आम्ही चौकशी केली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुळात सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नाविन बोअरवेलचे काम झालेले नसून याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता जुनी अर्थात
  
Gram Panchayat Naravali

  सन २०१८-१९ मध्ये नारीवली ग्रामपंचायतीच्या राखीव १५% सेस फंडातून ग्रामस्थांच्या सूचनेनुसार बौद्ध समाज वस्तीत एक बोअरवेल बांधण्यात आली होती. मात्र लॉकडाउनचा फायदा घेत संबंधित ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी याच बोअरवेलला नव्याने बांधल्याचे दाखवून नुकताच बिल काढले आहे. याबाबत ग्रामस्थांनी अधिक माहिती मिळवून खरा प्रकार उघडकीस आणल्याचे सांगितले आहे. तर याबाबत संबंधित दोषींवर अट्रोसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत तथा अन्य भा. द. वि. संहिते अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास नारीवली ग्रामस्थांकडून उपोषणाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा ही सादर पत्रात दिला आहे. तर याबाबत नेमकी काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  "या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि यात आढळून येणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल"
     -श्रीकांत धुमाळ, सभापती, पंचायत समिती मुरबाड

किशोर गायकवाड )
___________________________________________


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती)