ब्रेकिंग : सावर्णे येथे भीषण अपघात
![]() |
| Accident at Savarne |
[ KISHOR K. GAIKWAD ]
मुरबाड : ((दि. १८) तालुक्यातील सावर्णे येथे दुचाकी व कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून स्थानिक तरुणाच्या मदतीने जखमींना आळेफाटा (Alefata) येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरबाड तालुक्यातील सावर्णे गावाचा स्थानिक रहिवासी रोहन पारधी हा नेहमीप्रमाणे आज सायंकाळी आपल्या रान वाटेवरून जात असतांना राष्ट्रीय महामार्ग ६१ वरून एक अपघातग्रस्त व्यक्ती अचानक त्यांच्या समोर येऊन पडला. रोहन याने सदर जखमींला उपचारासाठी रवाना करण्या करिता तात्काळ उचलून महामार्गावर आणले असता त्याठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचे त्याला दिसून आले.

प्राप्त माहितीवरून आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुरबाड (Murbad) दिशेने येणाऱ्या एम. एच. ०५ टी. ६११० या हिरो स्प्लेनडोर दुचाकीची व माळशेज (Malshej) मार्गे जाणाऱ्या एम. एच. ०४ जी. जे. ३०२८ क्रमांकाच्या मारुती सुजूकी अल्टो कार यांच्या धडक घडून आली. यात दुचाकीवर स्वार असलेले अदिल मुलाजी (प्रतिकात्म नाव) व त्याचा मोठा भाऊ हे भीषण जखमी झाले आहेत. स्थानिक तरुण रोहन पारधी याने प्रसंगावधान राखत या जखमींना ऍम्ब्युलन्स बोलवून आळेफाटा येथील सोनवणे हॉस्पिटल येथे उपचारासाठी रवाना केले आहे. तर संबंधित कार चालक यात किरकोळ जखमी झाल्याचे बोलले जात असून पोलीस कर्मचारी ही घटनास्थळी दाखल झाले होते. सदर जखमी भाऊ हे दुचाकीवर चादरी विकण्याचा व्यवसाय करीत असून त्याच निमित्ताने ते आळेफाटा येथून मुरबाड दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत असून या घटने बाबत अधिक तपास टोकाकडे पोलीस करीत असल्याचे समजते.
( किशोर गायकवाड )
___________________________________________



0 Comments