जुनी पेन्शन? मग पगार पण जुनाच घ्या; शासकीय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय आंदोलन सोशियल मिडियावर ट्रोल..! [ KISHOR GAIKWAD MURBAD ]
'पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', मुरबाडमध्ये शासकीय कर्मचारी जुन्या पेंशनच्या मागणीसाठी तहसिलदार कार्यालयावर...
मुरबाड (दि. १५) : (किशोर गायकवाड) जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागू व्हावी, या प्रमुख मागणीसाठी सद्या राज्यभर शासकीय कर्मचारी वर्गाने बेमुदत संपाचा पवित्रा घेतला आहे. मात्र या संपाच्या चर्चांनी सोशियल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून याबाबत हजारो-लाखोंच्या संख्येने प्रतिक्रीयांचा पाऊस पडत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा (Government Staff) राज्यव्यापी आंदोलन सोशियल मीडियावर (social media) नेटकऱ्यांकडून चांगलाचा ट्रोल झाला असून जर 'जुनी पेन्शन पेन्शन हवी आहे तर पगार पण जुनाच घ्या', 'जुनी पेंशनची मागणी करणाऱ्यांनी आठ तासातले किती तास काम करता? ते आधी मेंन्शन' (mention) करा', 'उद्धट भाषा वापरतात हे लोक नेहमी', अशा आंदोलनाच्या भूमिके विरोधात तर 'भविष्यात आपल्या मुलांना सरकारी नोकरीत समस्या येणार नाही', म्हणून आंदोलन सुरू असल्याच्या दुहेरी प्रतिक्रिया सोशियल मीडियावर वाचायला मिळत आहेत.
'भरमसाठ पगार घेणारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेंशन मागत आहे पण जर अशा गलेलठ्ठ् पगार घेणारे कर्मचारीवर्ग संपावर जात असेल तर ती स्वःर्थासाठी केलेला हा संप आहे. आज झाडूवाल्या रिक्षावाला खासगी नोकरदार वर्गाची अवस्था काय?', 'पेन्शन तर नकोच पण पगार कमी केला पाहिजे', 'काम घेऊन आलेल्यांना समाधानकारक वागणूक देत नाही', 'आमदार खासदार यांची पण पेन्शन बंद करा...... शेतकऱ्याला पेन्शन द्या हिंमत असेल तर',
'भरघोस पगार मिळत असतानाही जर १८ लाख शासकीय कर्मचारी १३ कोटी जनतेला वेठीस धरणार असेल तर सगळ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. यांना 6 वा वेतन आयोग पाहिजे, 7 वा वेतन आयोग पाहिजे उद्या 8 वा, 9 वा वेतन आयोग पण मागतील... वरून पेंशन पण पाहिजे. सर्व सुख सुविधा, सुट्या, मेडिकल, भत्ते आणी आणखी बरंच काही पाहिजे. पण काम शून्य. एकीकडे शेतकरी व असंघटित कामगारांची परिस्थिती जेमतेम आहे. असंघटित कामगारांना व शेतमजूरांना हप्त्यात 3-4 दिवस जेमतेम काम मिळतं आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे इतके लाड बरे नव्हे. खाजगी क्षेत्रात काम दाखव व पगार घे या पद्धतीने काम चालतं. दुसरीकडे सरकारी क्षेत्रात काम पण करायचं नाही आणि गलेलठ्ठ पगार पण घ्यायचा. राज्यात लाखो युवक बेरोजगार आहेत. त्यांना जास्त पगार ही नको आणि पेंशन ही नको तरी ते काम करायला तयार आहे. मी तर म्हणतो कर्मचाऱ्यांचा आहे तो पगार पण कमी करून नविन मुलांना नोकऱ्या द्या.',
तर 'सर्वांनाच दोष देता येणार नाही. काही सरकारी कर्मचारी सहकार्याची भावना ठेवतात पण काहीना सरकारी नोकरी चा माजं आसतो. हे ही तितकेच खर आहे.', 'काही का असेना,पेंशन योजना असायला हवी', 'हा संप म्हणजे शेतकऱ्यांच्या शासकीय नोकरीत असलेल्या मुलांचा संप आहे.' अशा लाखोंच्या संख्येने प्रतिक्रिया सोशियल मीडियावर वाचायला मिळत आहेत.
मुळात परिवहन कर्मचारी, विद्युत कर्मचारी यांची कामे जोखमीची असून त्यांना त्याप्रमाणे पगारं दिसून येत नाही. तसेच सफाई कर्मचारी, जे स्वच्छता राखण्यासाठी घाणीची कामे करतात, त्यांना ही सन्मान देणारे पगार मिळणे अपेक्षित आहे
शासकीय कर्मचारी अनेकदा कामांच्या वेळेत उपलब्ध नसतात, शिवाय तेवढा वेळ कामात देत नाही. संपा दरम्यान विद्यार्थ्यां, सामान्य जनता यांच्या हिताचा विचार होणे गरजेचे होते. त्यामुळे जर नाही परवडत? द्या सोडून, mpsc upsc च्या मृगजळात अडकलेले लाखों सुशिक्षित तरुण घरी बसलेले आहेत किंवा नोकऱ्या अभावी आपल्या पात्रते पेक्षा कमी दर्जाचा काम करताना दिसत आहेत. जोपर्यंत पगारासाठी काम करणाऱ्या मानसिकतेचे कर्मचारी वर्ग असतील तोपर्यंत भ्रष्टाचार मुक्त भारत होणे नाही, अशी उद्गार जनसामान्यांकडून काढले जात आहेत.
![]() |
| Tahsil Office Murbad |
- [ किशोर गायकवाड मुरबाड ]
_____________________________________________
वाचा...
【जुनी पेन्शन? मग पगार पण जुनाच घ्या; शासकीय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय आंदोलन सोशियल मिडियावर ट्रोल..!







0 Comments