PROUD : दक्ष पोलिस कर्मचारी व प्रामाणिक रिक्षा चालकामुळे महिलेला मिळाले चार तोळे सोन्याचे दागिने [KISHOR GAIKWAD]

Jewllery found in Rickshaw

PROUD : दक्ष पोलिस कर्मचारी व प्रामाणिक रिक्षा चालकामुळे महिलेला मिळाले चार तोळे सोन्याचे दागिने 

The woman got her four ounces of gold due to diligent Murbad Police personnel and honest Rickshaw driver

[KISHOR GAIKWAD]

मुरबाड : (दि. ४) प्रवासा दरम्यान विसर पडलेल्या सोन्याचे दागिने असलेल्या बॅगेचा अवघ्या काही तासांत शोध घेऊन महिलेला सुपूर्द केल्यामुळे मुरबाडचे दक्ष पोलिस कर्मचारी व प्रामाणिक रिक्षा चालक यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


   याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील वांजळे येथे राहणारे दीपक वामन लाटे (३३) व त्यांची पत्नी नूतन दीपक लाटे (२८) या दांपत्यांनी आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुरबाड येथे येण्यासाठी महामार्गावर एमएच ०५ बीक्यू २५१० क्रमांकाच्या एका प्रवासी रिक्षाला हात केला. यावेळी त्यांच्या सोबत कपडे, चार तोळे सोन्याचे मंगलसूत्र, कर्णफुले व अन्य दागिने असे सुमारे दोन ते अडीच लाखांचे ऐवज असलेली एक सामानाची बॅग होती.


  मात्र मुरबाड येथे रिक्षातून उतरतांना रिक्षाच्या मागे ठेवलेली सदर बॅग घेण्याचा या दाम्पत्यांना विसर पडला. काही वेळात लाटे यांना ही बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी तात्काळ तिनहात नाका येथील पोलिस चौकीवर धाव घेतली व सदर ठिकाणी उपस्थित असलेले पोलिस नाईक विजय गांजले यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिस नाईक गांजले यांनी तात्काळ सीसीटीव्हीच्या साहाय्याने सदर रिक्षाचा शोध सुरू केला व स्थानिक रिक्षा चालक तसेच शिवळे, सरळगाव येथील रिक्षा चालक यांचेशी संपर्क साधून रिक्षाचा वर्णन कळविला. सदर वर्णानाची रिक्षा सरळगाव येथे आढळून आल्याचे संपर्क साधण्यात आलेल्या रिक्षा चालक देविदास शिंगोळे यांनी गांजले यांना सांगितले. सदर बॅगेमध्ये असलेला मुद्देमाल सुरक्षित असल्याची खात्री करून जबाबदार मंडळींच्या उपस्थितीत लाटे दाम्पत्यांना सुपूर्द करण्यात आले.

 

   मुरबाड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरण जलदगतीने मार्गी लावण्यात आले असून पोलिस नाईक विनायक खेडकर, मेजर शरद शिरसाट तसेच महिला पोलिस नाईक होवाळ यांच्या सहकार्यमुळे मुद्देमाल वेळेत मिळाल्याचे गांजले यांनी सांगितले. या घटनेमुळे मुरबाडचे कर्तव्य दक्ष पोलिस कर्मचारी व प्रामाणिक रिक्षा चालक यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

-किशोर गायकवाड

_________________________________________________

असेच नवनवीन उपडेट्स साठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा






ADV

bestwaystoearn


(शब्द मशालच्या कोणत्याही बातमीमध्ये काही त्रुटी, सूचना, दुरुस्ती अथवा मार्गदर्शन असेल तर वाचकांनी कृपया खालील कमेंट बॉक्समध्ये कळवावे ही विनंती

0 Comments