नढई ग्रामस्थांच्या लढ्याला यश!
[KISHOR K. GAIKWAD]
मुरबाड (दि. २८): तालुक्यातील नढई ग्रामस्थ व सोसायटी ऑफ पिलार बाॕम्बे यांच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम लागला असून याबाबत मुरबाड तहसीलदार यांनी आदेश देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.
नढई ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी तसेच नदी व शेतकऱ्यांच्या शेतीवाडी कडे जाणाऱ्या परंपरागत रस्त्यावर सोसायटी ऑफ पिलार बाॕम्बे यांनी थेट डबर सिमेंटच्या भिंतीचे बांधकाम केल्याने संतप्त ग्रामस्थांनी याविरोधात वेळोवेळी तक्रारी तथा हरकती घेतल्या होत्या. परंतु सोसायटी ऑफ पिलार बाॕम्बे यांनी त्यांना न जुमानता सदर भिंतीचे बांधकाम सुरुच ठेवले होते. अखेर नढई ग्रामस्थांनी होत असलेल्या अन्याय पुराव्यांसह सादर करून मुरबाड तहसिलदार यांना विनंती करुन लक्ष देण्याची मागणी केली. त्यानुसार तहसिलदार तथा दंडाधिकारी मुरबाड यांनी दि. २२ जून रोजी सदर ठिकाणी सोसायटीचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्या समवेत स्थळ पाहणी करुन पंचनामा करण्यात आला होता. तसेच यावेळी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने व काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार घटनास्थळी उपस्थित होते.
तर सदर परिस्थिती पाहून सोसायटी आॕफ पिलार बाॕम्बेने केलेल्या संरक्षक भिंती पैकी १२ फूट बांधकाम ७ दिवसांत दूर करावे तथा तसे न केल्यास नढई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी ते काम निष्कासीत करावे व यापुढे भाविष्यात सदर परंपरागत वहिवाटींना अडथळा निर्माण होईल असे बांधकाम करु नये, अगर केल्यास ग्रामपंचायतने कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता ते काम निष्कासित करावे असे आदेश दि. २६ जून रोजी पारित केले आहे. तसेच सदर आदेशाचे भंग केल्यास भारतीय दंड संहिते प्रमाणे कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आपल्या लढ्याला यश आल्याची भावना नढई ग्रामस्थांमध्ये दिसून येत असून या न्याय प्राप्तीसाठी नढई ग्रामस्थ मुरबाड तहसिलदार यांचे आभार व्यक्त करीत आहेत.
[विविध प्रलंबित मागण्यांसाठी ओबिसीं बांधवांचा मुरबाड तहसिल कार्यालयावर हल्लाबोल..! ]
Nashik District Court Recruitment 2021|नाशिक जिल्हा न्यायालय भरती - Shabd Mashal
Indian Army NCC Recruitment 2021 | भारतीय सैन्य NCC भरती 2021 - Shabd Mashal
Thane Municipal Corporation Recruitment 2021| TMC Recruitment 2021 - Shabd Mashal
ADV











0 Comments